Friendship Day Quotes In Marathi मैत्री दिन कोट्स मराठी  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,
	स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
				  													
						
																							
									  
	पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,
	दैवानेच लाभतात… 
	– व.पू. काळे
				  				  
	 
	जो सर्वांचा मित्र आहे तो कोणाचा मित्र नाही.
	– अरस्तु
	 
	मैत्री एक सोपी व्याख्या आहे,
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	रोज आठवण यावी असं काही नाही,
	रोज भेट व्हावी असं काही नाही,
	पण मी तुला विसरणार नाही,
				  																								
											
									  
	ही झाली खात्री आणि
	तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री 
	– पु. ल. देशपांडे
	 
				  																	
									  
	जंगली प्राण्यापेक्षा एखाद्या कपटी आणि दुष्ट मित्राला जास्त घाबरले पाहिजे, एखादा प्राणी फक्त आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतो, परंतु वाईट मित्र आपल्या बुद्धीला हानी पोहोचवू शकतो.
				  																	
									  
	- बुद्ध
	 
	मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते 
	आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे
				  																	
									  
	– महात्मा गांधी
	 
	जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल याच्या भितीने सावध राहतो तो तुमचा मित्र नाही
				  																	
									  
	– गौतम बुद्ध
	 
	मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात
				  																	
									  
	– अब्राहम लिंकन
	 
	मैत्री करण्यात सावकाश राहा, परंतु जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ती घट्टपणे टिकवा आणि त्यावर ठाम रहा.
				  																	
									  
	- सुकरात
	 
	मित्र जन्माला येतात, बनवले जात नसतात.
	- हेनरी बी. एडम्स
	 
	प्रकाशात एकटे चालण्यापेक्षा मी मित्रासोबत अंधारात चालणे पसंत करेन.
				  																	
									  
	- हेलन केलर