शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (09:19 IST)

गण गण गणात बोते

मिटता डोळे, तुची दिसशी 
माझी या नयना !
कृपादृष्टी तुझीच असू दे रे 
मजवरी दयाघना,
 
थोर भाग्य शेगावा लाभले,
म्हणुनी तेथे प्रकट जाहले,
धन्य धन्य जन जे तुझीया 
सानिध्यासी आले,
 
भाग्य मजसी न लाभले,
प्रत्यक्ष दर्शनाचे,
सेवा न घडली तुझी गजानना, 
हे दुःख मनीचे,
 
पण तरी ही कृपा छत्र तुझे ,
मज डोक्यावर भासते,
अनुभव त्याचा मजसी,
कृपा तुझी दिसते,
 
करवून घे तू सेवा निरंतर, 
दे तशीच बुद्धी,
आणीक आणीक होवो माझ्या 
भक्ती मध्ये वृद्धी,
 
लीन तुझ्या पावली 
अखंडीत रे राहीन,
सदैव तुजला माझ्या 
नजरेसमोर मी पाहीन!
 
.... अश्विनी थत्ते