गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Modified: गुरूवार, 19 डिसेंबर 2024 (11:42 IST)

गुरुवारी गजानन महाराजांच्या भक्तांना पाठवा हे भावपूर्ण संदेश Gajanan Maharaj Status Guruvar

भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले,
आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले,
तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे,
गजानना...मला नेहमी तुझ्या सहवासात राहु दे...
 
अनंत कोटी ब्रह्माण्ड़ नायक,
महाराजधिराज,योगीराज, परब्रह्म, सचिदानंद,
भक्तपतिपालन, शेंगाव निवासी समर्थ सद्गुरु,
श्री गजानन महाराज की जय.....
 
देव पाहीला शेगावीचा
वंदन त्यांना करा...
" गण गण गणात बोते"
बॊला मंत्राचा गजर करा...
श्री गजानन महाराज की जय..
 
परिस स्पर्शता लोहाते|
सुवर्णच तो करी त्याते|
संत कृपा दान ते|
कल्याण भक्तांचे करितसे||
||गण गण गणात बोते||
जयगजानन।।
 
शेगावीची सुंदर हवा बोलती
जय गजानन
पक्षीकुजन मंजुळ गीतगाती
जय गजानन
वृक्षवल्लरी सुखे सळसळती 
जय गजानन
भक्तीभावाने भक्त बोलती
जय गजानन
मनी मधु नमन कौतुकती
जय गजानन
जय गजानन
 
अर्पितो गजानना पुष्प मी तुझ्या चरनी
तुझाच ध्यास राहावा चित्ती आणी स्मरनी
जिकडे पहावे तिकडे तु दिसशी नयना
असाच कृपा प्रसाद रहावा आमच्या जिवना
गण गण गणात बोते
जय श्री गजानन माऊली
 
शेगांव ग्रामीं वसले गजानन |
स्मरणे तयांना हरतीत विध्न ||
म्हनुण स्मरा अंतरी सदगुरूला |
नमस्कार माझा श्री गजाननला ||
ॐ जय गजानन
गण गण गणात बोते
 
बहुजन्म पुण्याईने |
आम्ही येथे आलो |
सहजची उध्धारिलो |
गजानन कृपे |
गजानन गुरु माझा |
कृपेचा दातार |
कैवल्याचा अवतार |
गजानन स्वामी |
शेगांव़ी अवतरला |
गण गण गणात बोते
 
गजानन नाम ज्यांचे मुखी आहे,
सदा सर्वदा तो चिंतामुक्त राहे,
धनामृत गंगा नीट मुखी वाहे,
गजानन माझा त्या कृपेने पाहे,
जय गजानन जय गजानन जय गजानन....
 
या शेगावाची शान देवा तुझं देऊळ |
आम्हा भक्त जनांचा मान देवा तुझं देऊळ |
भक्तांचा तू कैवारी |
दिन जनांचा वाली |
भक्त जनांचा उद्धार कराया स्वारी निघाली |
ठेवलं गजानन तुझं नाव देवा तुझं देऊळ |
गरीब असो वा श्रीमंत येतो तुला रं शरण |
दुख्खी असो वा संकटी सांगे तुला गार्हानं |
जिथ भक्तांच समाधान देवा तुझं देऊळ |
परब्रम्ह तू कृपानिधि |
कृपा करी मायेची या चंद्रकांत वरी |
तुझ्याच चरणी वाहीली रे काळजी संसाराची |
माझ्या साठी रं जीव का प्राण देवा गजानना तुझं देऊळ | 
|| बोला गजानन महाराज की जय ||