श्री गजानन महाराज भजन
शेगावीच्या राणाला डोळे भरून पाहातो ।
आम्ही गजाननामया भजनात नहातो ।।घृ।।
दतरूपी गजानन, सत्यरूपी गजानन ।
देवरूपी गजानन, तुम्हा आम्हा पावो ।
आम्ही गजाननामया भजनात नहातो ।।१।।
प्रेमरूपी गजानन, देहरूपी गजानन ।
सखारूपी गजानन, तुम्हा आम्हा लाभो ।
आम्ही गजाननामया भजनात नहातो ।।२।।
सांई रूपी गजानन, सूयथरूपी गजानन ।
आत्मारूपी गजानन, अंतरंगी राहो ।
आम्ही गजाननामया भजनात नहातो ।।३।।
मातृरूपी गजानन, चपतृरूपी गजानन ।
गुरूरूपी गजानन, आम्हा सुख देवो ।
आम्ही गजाननामया भजनात नहातो ।।४।।