भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुली बरोबर झाले असे. सिद्धी पासून 'क्षेम' आणि रिद्धी पासून 'लाभ' नावाचे मुले झाले. लोक परंपरेत ह्याला शुभ-लाभ असे म्हणतात. गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थिती झाले असे. त्यांचे लग्न होत नव्हते. या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजक पद्धतीने मिळते.
भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात. कोणतेही शुभ कार्य करण्याच्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. चला जाणून घेऊ या त्यांच्याशी निगडित 5 लोकप्रिय कथा...
1 पहिली कथा : पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत कैवल्य केले असे. या उपवासामुळे आई पार्वतीस श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले. या उपवासासाठी शिव ने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिले तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली.
शिव महापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनविण्याची कल्पना त्यांचा सखी जया आणि विजया कडून मिळाली. त्यांचा सख्खींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा, जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल. या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली.
2 दुसरी कथा : एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झाले. या वर दुखी असलेल्या पार्वती(सती नसे)ने ब्रह्माला म्हटले - 'ज्याचे डोकं सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या'.अश्या प्रकारे पहिले डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले. अश्या प्रकारे गणेश 'गजानन' बनले.
एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसवून पार्वती अंघोळ करण्यास गेल्या. तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले. गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिले. तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर मार केला. या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला असे. जेव्हा पार्वतीने बघितले की त्यांचा मुलाचे डोकं कापले गेले आहे तर त्या फार संतापल्या. त्यांचा रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोकं गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले.-स्कन्द पुराण.
3 तिसरी कथा : एकदा शिवाप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले. त्यावेळी परशुराम कार्तवीर्या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे. ते शिवाचे अनन्य भक्त होते. गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले. गणेशाने त्यांना धूळ चाटवली. तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला. तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात.
4 चवथी कथा: भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजिले. सर्व देवांना आमंत्रण मिळाले, पण गणेशाला दिले नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही? मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल.
नंतर ही गोष्ट गणेशाला समजतातच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वह्राड तिथून निघाल्यावर रथांची चाकं जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले. सर्वांनी आपापल्यापरीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही, बऱ्याच जागीतून तुटायला लागले. कोणाच्या ही सुचत नव्हते की आता काय करावं. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही. जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्यसिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा करतातच रथाची चाके निघाली.
5 पचावी कथा : देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले. मोदक बघून दोन्ही मुले(कार्तिकेय आणि गणेश)आई कडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थ क्षेत्रांना प्रथम भेट देईल, त्यालाच हे मोदक मिळेल. आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले.
हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्वप्रकारचे उपास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्यापेक्षा वर आहे. म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे. आई-वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल.-पद्मपुराण.