ganesh chaturthi
✕

गणेश गीता अध्याय ८

Updated: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (13:44 IST)
 
ऐशा रुपास पाहुन, भूपति वदतो प्रभूस हे ईशा ।
 
८.
 
त्वद्देहीं बघतों मी, देव ऋषी पितरवृंद जगदीशा ॥१०॥
 
नानाविध अर्थांनीं, युक्‍त असे सप्त ते मुनी पाहें ।
 
९.
 
तितकेच गिरि नीरधी, पाताळें नी द्विपांस मी पाहें ॥११॥
 
पृथ्वी अकाश स्वर्ग नि, मानव राक्षस तसेच उरगांस ।
 
१०.
 
ब्रह्मा विष्णू शिवही, पाहे सुर इंद्र आणि प्राण्यांस ॥१२॥
 
शिर-भुज-अनंत युक्‍तचि, अग्नी इव प्रखर तेज असें ।
 
११.
 
ईशा अनादि आदी, अगण्य रुपीं अशीं मला भासे ॥१३॥
 
कुंडल किरीटधारक, वक्षस्थल स्थूल-रुप आनंदी ।
 
१२.
 
बघतां भय वाटे कीं, श्रेष्ठ असें रुप पाहिलें नगदी ॥१४॥
 
सुरवर विद्याधर नी, मुनि मानव यक्ष आणि गंधर्व ।
 
१३.
 
नर्तकि किन्नर आदी, सेवेति अपुल्या रुपास ते सर्व ॥१५॥
 
वसु रुद्र रवी अयंची, तत्गणवृंदीं नि सिद्ध साध्य असे ।
 
१४.
 
सेविति पाहति मोदें, ऐशा रुपास मीहि पाहतसें ॥१६॥
 
ज्ञाता अक्षर वेद्यहि, रक्षक पालक असेच धर्माचे ।
 
१५.
 
पृथ्वी दिशा नि स्वर्गा, पाताळें व्याप्‍त असुन शेष रुपांचे ॥१७॥
 
दर्शन घडलें मजला, आणिक दिसलें पुढें मला काय ।
 
कथितों प्रभूवरा मी, ऐकावें रुपवर्णना काय ॥१८॥
 
दाढा अनेक असती, अनेक विद्या निपूण रुप असें ।
 
१६.
 
पाहुन समस्त लोकहि, भ्याले नी त्यापरीच भीत असे ॥१९॥
 
प्रलयाच्या अग्नी इव, तेजस्वी तें त्वदीय मुख आहे ।
 
शिर हें जटील ऐसें, आकाशा लागलें असें पाहें ॥२०॥
 
पाहुन भ्रमीत झालों, आणखि पाहें नगादि सुर नाग ।
 
तैसे खल तव उदरीं, राहुनि योनीं अनेक तव आंग ॥२१॥
 
यापरि अंतीं लीनचि, होती सारे त्वदीय ठायातें ।
 
१७-१८.
 
जलिं जल मिळतां होतें, लीन तसें कीं समस्तसें तूंतें ॥२२॥
 
अग्नी यम इंद्रादी, निऋति वायू वरुण त्वद्रूपें ।
 
१९.
 
तैशीं कुबेर रवि शशि, जग सारें ईशनादि त्वद्रूपें ।
 
यास्तव नमितों देवा, प्रसाद करणें सुदान मज द्या हें ।
 
२०.
 
अपुल्या इच्छा लीला, कळण्याविषयीं समर्थ नच आहे ॥२४॥
 
आतां विराटरुपा, गुप्त करुनी धरा प्रथम रुप ।
 
यास्तव त्वच्चरणांसी, लीन असा मी सुदास हा भूप ॥२५॥
 
भूपति वरेण्य म्हणतो, ईशा मज ज्ञानचक्षु हे दिधले ।
 
२१-२२.
 
त्याच्या योगें उग्रस, रुप असें हें खरोखरी दिसलें ॥२६॥
 
सनकादिक नारद हे, बघते झाले कृपाप्रसादेंच ।
 
२३.
 
गणपति म्हणे वरेण्या, माझें हें विश्वरुप पूर्वीच ॥२७॥
 
असती अयोगि जन जे, त्यांना माझें दिसे न रुप असें ।
 
पुढती ऐकें राया, कथितों त्यांनींहि पाहिलें ऐसें ॥२८॥
 
होते दाते तपिनी, आणिक ते वेदशास्त्रकूशलही ।
 
२४.
 
दिसलें नाहीं त्यांना, जाणें हें भक्त राजसा तूंही ॥२९॥
 
भक्तीनें मम रुपा, बघणें नी जाणणेंच शक्य असे ।
 
२५.
 
यास्तव मग साध्य असे, रुप बघे भक्त-राव भूप असें ॥३०॥
 
माझा भक्‍त असूनी, संगरहितसा त्यजीत क्रोधासी ।
 
कर्म करुनियां माते, अर्पी सर्वत्रसा मदिय वासी ॥३१॥
 
जो सार्‍या भूतांना, समदृष्टीनें बघे सदा खास ।
 
माझेसंनिध येतो, त्याला घडतो सदैव मम वास ॥३२॥
 
अष्टाध्यायीं कथिलें, माझें हें विश्वरुपदर्शन हें ।
 
२६.
 
ऐकें राया पुढती, क्षेत्रज्ञाचें कथानका तूं हें ॥३३॥
 
मोरेश्वसुत वेंची, कवनें सुमनें करुन कुसुमांसी ।
 
अर्पी अपुले शिरसीं, आवडिनें तीं रुचोत अपणांसी ॥३४॥

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments