गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By

गणेश गीता अध्याय ३

Shree Ganesh Geeta Aadhyay 3
(गीति)
 
गणेशपुराण यांतिल, गणेशगीता प्रसंग हा तिसरा ।
 
सूत मुनींना सांगति, गणपति सांगे नृपाल या तिसरा ॥१॥
 
गणपति म्हणे वरेण्या, पूर्वी जी प्रथम होत उत्पत्ती ।
 
१.
 
त्या वेळीं त्रिगुणात्मक, ब्रह्मा विष्णू महेश हे होती ॥२॥
 
ज्या योगानें तीनहि, मूर्ती होती जगांत निर्माण ।
 
त्या योगानें तीनहि, गुण वसती हरि हरादि विधि जाण ॥३॥
 
ऐसा विष्णू जाणुन, त्यासी जो मीं निवेदिला योग ।
 
विष्णूपासुन रविला, त्यापुढती त्या सुतास कथिं योग ॥४॥
 
वैवस्वत विष्णूचा, सूत असे त्या मनू असें म्हणती ।
 
त्यापासुन ऐकूनि तो, योग पुढें कीं मनी जगा कथिती ॥५॥
 
विज्ञानप्रतिपादन हा, योग असे तो परंपरा येत ।
 
२.
 
कथितों वरेण्य भूपा, प्रियकर माझा सुभक्त तूं होत ॥६॥
 
कालगतीनें भूपा, विश्वासासी तसाच श्रद्धेस ।
 
३.
 
झाला अपात्र म्हणुनी, गुप्तच होता बहूत तो दिवस ॥७॥
 
यापरि गुप्त असे तो, योग तुला सांगतों श्रवीं राया ।
 
हितकर फार असूनी, वेदांचें सार सर्व आहे या ॥८॥
 
पूर्वी तुजला कथिला, होता तो योग सांगतों ऐक ।
 
४.
 
झाला स्तब्धच भूपति, ऐकून ऐसें सुभाष्य क्षण एक ॥९॥
 
पुसतो भूपति प्रभुला, सुलीन वाचे पुढील प्रश्नांनीं ।
 
अपुला जन्महि झाला, श्रविलें मीं लिंगगर्भ या स्थानीं ॥१०॥
 
ऐसें असून म्हणतां, पूर्वी हा योग विष्णुला कथिला ।
 
५.
 
गूढार्थ स्पष्ट करुनी, म्हणतां हा सांगणें प्रभू मजला ॥११॥
 
गणपति भूपा सांगे, मज तुज झाले अनेक ते जन्म ।
 
६.
 
तुजला स्मरतच नाहीं, मजला स्मरती समस्त ते जन्म ॥१२॥
 
विष्णूआदी करुनी, मजपासुन ते समस्त सुर होती ।
 
७.
 
युगिं युगिं जन्मा येती, अंतरबाह्यहि मदीय ते विरती ॥१३॥
 
श्रेष्ठ असा ब्रह्मा नी, आहे तैसाच तो महादेव ।
 
८.
 
स्थावर जंगम सारें, विश्वहि मी कीं असेंच तें सर्व ॥१४॥
 
जनन मरण नसे तीं, अनादि आत्मा असेच ईश्वर मी ।
 
९.
 
त्रिगुणात्मक मायेचा, आश्रय घे जनन बहुत योनी मी ॥१५॥
 
जेव्हां अधर्म पसरे, धर्माचा र्‍हास होतसे तेव्हां ।
 
१०.
 
साधू रक्षण करणें, दुष्टनिवारण करीतही तेव्हां ॥१६॥
 
यास्तव मजला लागे, जन्मुन यावें तदर्थ महिवरती ।
 
११.
 
नानाविध लीलांनीं दुष्टांचे नाश करुनि बहु रीती ॥१७॥
 
स्थापावें धर्माला, नाश करावा अधर्म हें कार्य ।
 
यास्तव अवतारुनी, भूवरि येणें तदर्थ हें राय ॥१८॥
 
मुनिगणसाधू यांचें, पालन करणें प्रमूख हें कार्य ।
 
वर्णाश्रमधर्माला, रक्षावें हें अधींच जनकार्य ॥१९॥
 
युगिं युगिं अवतरणें हें, जाणे जो त्या त्वरीत अवतारा ।
 
१२.
 
त्याला जन्म पुन्हा कीं, येतच नाहीं म्हणून मुक्‍त खरा ॥२०॥
 
ताठा ममता सोडुन, जाणे जो कर्म वीर्य ममरुपा ।
 
१३.
 
तो मुक्त सत्य होतो, जन्म न त्याला पुन्हां न ये भूपा ॥२१॥
 
निर्भय निरिच्छ असुनी, मजवर श्रद्धा करुन आश्रय ते ।
 
१४.
 
ज्ञानें तपेंच पावन, होउन येती समीप माझ्या ते ॥२२॥
 
ज्या ज्या भावें मजला, सेविति ते ज्ञानमुक्तसे योगी ।
 
१५.
 
तैशी तैशी त्यांना, फलप्राप्ती मी त्वरीतशा मार्गी ॥२३॥
 
माझे अनुयायी जे, होती ते मदिय मार्ग अनुसरती ।
 
१६.
 
अपुल्या व दुसर्‍यांच्या, कर्मांमाजी समानसे असती ॥२४॥
 
जे जे मानव करिती, या लोकीं जें सहेतुकें कर्म ।
 
त्या कर्मानें तोषित, इच्छितसे देव होति हें वर्म ॥२५॥
 
देती त्वरीत त्यांना, कर्माचें तें सुयोग्य फल राया ।
 
१७.
 
ऐकें पुढील भाषण, श्रवण करीं बा सुशांत राहुनियां ॥२६॥
 
सत्त्व-रज-तमापासुन, या लोकीं चार वर्ण निर्मियले ।
 
१८.
 
या वर्णांचें मिश्रण, कथितों तुजला समग्र तें पहिलें ॥२७॥
 
परंतु कर्मापासुन, जे गुण होती जनीत त्यांनीं ते ।
 
१९.
 
नित्य अलिप्त नि ईश्वर, मजसी बुधजन आणिक ते ॥२८॥
 
कर्ता आणि अकर्ता, म्हणती ऐसें अनेक नामांनीं ।
 
नामें प्रमूख माझीं, ऐकें भूपा सुशांत कर्णांनीं ॥२९॥
 
निरिच्छपणिं जो जाणे, अपुल्याला कोण आपण आहोंत ।
 
२०.
 
तो कर्मबंधनानें, होतच नाहीं सुबद्ध म्हणतात ॥३०॥
 
यास्तव पूर्वीचें तें, कर्म करीती मुमुक्षुजन सारे ।
 
कर्म प्राधान्य असें, मानिति तें तत्त्व साच भूपा रे ॥३१॥
 
ज्याला अज्ञानाचें, बंधन आहे सहेतुकें भव हा ।
 
ऐसें जाणून येतां, होतो तो मुक्‍तकारणीं या हा ॥३२॥
 
कारण ज्या ठायीं ते, बुद्धी कूशल महर्षिही भुलती ।
 
(गणेशगीता श्लोक २१ व २२)
 
यास्तव कर्म अकर्महि, तुजला कथितों सुबोधशा रीती ॥३३॥
 
कर्म अकर्म नि तिसरें, विकर्म यांचें मुमुक्षुंनीं तत्त्व ।
 
 
तिनीं समजुन घेण्या, योग्य असें सांगतों पुढें तत्त्व ॥३४॥
 
या तीनीं कर्मांची, आहे गति ती बहूत गंभीर ।
 
२३.
 
आहेस भक्त यास्तव, कथितों तुजला समर्थ साच तर ॥३५॥
 
जें ज्ञान क्रियेमाजी, अक्रियतेचें असें असे तें हें ।
 
अक्रिय गोष्टीमाजी, क्रिय गोष्टींचें दिसोन येतें हें ॥३६॥
 
ऐसें ज्ञान जयाचें, कर्म करुनिही अकर्मसें समजे ।
 
२४.
 
इहलोकांत तयांचें, कर्मापासून मुक्त तो समजे ॥३७॥
 
कर्मांकुर याच्या जो, कर्मारंभ करी वियोगानें ।
 
२५.
 
ज्ञाते म्हणती आहे, सक्रिय तो तत्त्वदर्शि या ज्ञानें ॥३८॥
 
साधनविरहित मानव, तृप्त निरंतर त्यजील फल हेतू ।
 
२६.
 
ऐसें कर्म करी जयिं, तयिं लाभे फल सुयोग्य जाणें तूं ॥३९॥
 
त्यागी निरिच्छ मानव, आत्मा जिंकी जरी करी कर्मे ।
 
२७.
 
त्यापासुन तरि पापी, नच होई तो करुनियां कर्मे ॥४०॥
 
मत्सर द्वेषहि दोनी, सोडुन हे भाव सर्वदा सम त्या ।
 
सिद्धि असिद्धी दोनी, मानी मानव करुन कर्मा त्या ॥४१॥
 
कर्म करुनियां मानव, बद्ध न होई मिळेल फळ त्यांत ।
 
२८.
 
तोषित राहे मानव, त्या योगें भूपती तुला कथित ॥४२॥
 
विज्ञानयुक्त ज्ञानी, सर्वस्वीं विषय मुक्तसा आहे ।
 
२९.
 
याज्ञिक कर्म तयाला, बाधक नोहे सुलीनता लाहे ॥४३॥
 
याज्ञिक अग्नी आणिक, होमाचे नी तसेच हवनाचे ।
 
अर्पिति मजला द्रव्या, ब्रह्माला पावतें नृपा साचें ॥४४॥
 
कारण कर्म असें तें, ब्रह्मार्पण बुद्धिनेंच तें करिती ।
 
३०.
 
यास्तव कर्माठायीं, याज्ञिक ते सर्वदा नृपा रतती ॥४५॥
 
कांहीं योगी दैवा, मानिति साचे तयास हा यज्ञ ।
 
३१.
 
कांहीं योगी अग्नी, ब्रह्माला रुपधारिसा यज्ञ ॥४६॥
 
निग्रहिरुपी अग्नी, त्यामाजी हवन इंद्रिया करिती ।
 
३२.
 
इंद्रियरुपी अग्नी, त्यामाजी विषय ते हवी देती ॥४७॥
 
पंचप्रान नि इंद्रियं, यांचीं कर्में समर्पिती कांहीं ।
 
३३.
 
ज्ञानें प्रकाशरुपी, आत्मा अग्नीच मानिती त्यांही ॥४८॥
 
द्रव्यें तपें नि कोणी, स्वाध्यायानें मदीय पूजन हें ।
 
३४.
 
करिती तसेंच यति ते, ज्ञानानें यजन करिति भूपा हें ॥४९॥
 
प्राणांत अपानाची, गति तैशी ती निरोधिती ज्ञानी ।
 
अपान वायूमध्यें, प्राणाची ती निरोधती ज्ञानी ॥५०॥
 
प्राणायाम म्हणावें, भूपा या नियमबद्धशा कृतिला ।
 
सांगेन अतां पुढें ती,ऐकें साद्यंतशा पुढें विधिला ॥५१॥
 
प्राणादिक वायू हे, जिंकुनि गतिचें तयांत तें हवन ।
 
करितात यज्ञ ऐसा, त्यायोगें पाप नाश तें करुन ॥५२॥
 
नाना प्रकार परिंनीं, ज्ञानी करिती बहूतसें यजन ।
 
३५/३६.
 
यज्ञीय शेष भक्षुनि, ब्रह्मपदालागिं पावती यजुन ॥५३॥
 
यज्ञ करित जे नाहीं, त्यांना हाही मिळेच ना लोक ।
 
३७.
 
त्यांना मिळेल कोठुन, तदितर दुसरा मिळेल का लोक ॥५४॥
 
वेदानें कथिलेले, कायिक वाचिक तृतीय मानसिक ।
 
३८.
 
जाणुन घेउन तीनी, करितां तूं मुक्त होसि हें ऐक ॥५५॥
 
सार्‍या यज्ञांमाजी, मान्य असे ज्ञानयज्ञ मज राया ।
 
मोक्षाला साधन तो, नाशक आहे समस्त कर्मां या ॥५६॥
 
नाशुन कर्मां सार्‍या, मोक्षाला ज्ञानयज्ञ नेत असे ।
 
३९.
 
यास्तव त्याला जाणुन, करणें अभ्यास सर्वदा परिसें ॥५७॥
 
सत्पुरुषांना वंदुन, सेवुन नंतर पुसे तयां ज्ञान ।
 
४०.
 
तत्त्वज्ञानी असती, सांगति सत्वर सुयोग्यसें ज्ञान ॥५८॥
 
नाना संग करी जो, सेवित नाहीं कधींच संतांस ।
 
४१.
 
तो बद्ध असा होतो, भवपाशानें सदैव हें परिस ॥५९॥
 
सद्‌गुण प्राप्ती होते, साधुसमागम घडे सदा राया ।
 
४२.
 
दुःखें नाशुन सारीं, इहपरलोकीं स्वहीत साधाया ॥६०॥
 
आहेत सुलभ सारीं, इतर तशीं साधनें करायास ।
 
साधुसमागम दुर्लभ, आहे यास्तव करी प्रयत्‍नास ॥६१॥
 
साधूंपासुन लाधे, ज्ञान खरोखर सुबोधसें राया ।
 
४३.
 
बंधन पावत नाहीं, भवपाशांनीं अनेक कर्मां या ॥६२॥
 
इतुकें झाल्यानंतर, ज्ञानानें सर्व भूत आत्म्यांत ।
 
४४.
 
दिसती मनुजा ऐकें पापी असुनी तरीहि तो मुक्त ॥६३॥
 
जैसा अग्नी भस्मचि, या लोकींच्या प्रसिद्ध वस्तूंचें ।
 
४५.
 
करितो त्यापरि तैसा, ज्ञानाग्नी हा घटीत कर्मांचें ॥६४॥
 
ज्ञानाइव दुसरी ती, वस्तू पावत नसेच भूपा ही ।
 
४६.
 
ज्ञानाच्या योगानें, कांहीं कालें स्वआत्मता लाही ॥६५॥
 
भक्‍तीयुक्‍त असा तो, इंद्रियं जिंकी तयास हो ज्ञान ।
 
४७.
 
कांहीं कालें करुनी, सत्वर मोक्षास नेतसे ज्ञान ॥६६॥
 
भक्‍ती श्रद्धाविरहित, संशयवृत्ती असे सदा जो तो ।
 
४८.
 
प्राप्ती कल्ल्याणाची, नाहीं नी लोक दोन अंतर तो ॥६७॥
 
आत्मज्ञानी रत जो, संशयवृत्ती समूळ मावळली ।
 
४९.
 
कर्मे करीत असतां, बंधनकारक न हो कदा काळीं ॥६८॥
 
संशयरुपी ऐसें, अंतस्थहि तो असोन अज्ञानी ।
 
५०.
 
नाश करितसे योगी, तो त्यासी ज्ञानरुप खड्‌गांनीं ॥६९॥
 
विज्ञानप्रतिपादन हा, गणेशगीता तृतीय अध्याय ।
 
संपूर्ण असे झाला, करितों अर्पण प्रभूकृपा होय ॥७०॥
 
कवनेंरुपी शमि ती, अर्पी प्रभुला सुलीनसा दास ।
 
मोरेश्वरसुत नमितों, साष्टांगें करुन पादकमलांस ॥७१॥