श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)

ganesh
पूजन प्रारंभ
श्री गणेशाचे ध्यान
विधी: ध्यान म्हणून प्रणाम केला जातो.
>
ध्यान मंत्र: 'सृष्टीच्या प्रारंभकाळात प्रकट झालेले जे या जगाचे परमकारण आहे त्या गणेशाला चार भुजा आहेत, गजवदन असल्यामुळे त्यांचे दोन्ही कान सुपाच्या आकाराचे आहेत, त्यांना केवळ एकच दात आहे. तो असून त्यांचा रंग लाल आहे. त्यांला लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले प्रिय आहेत. त्याच्या चार हातापैकी एका हातात पाश, दुसर्‍या हातात अंकुश, तिसर्‍या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्राबरोबर आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. जो व्यक्ती श्रीगणेशाची नित्य पूजा करतो त्याला योगीत्व प्राप्त होते.' हे गणराया! आपल्याला प्रणाम असो.
आवाहन व प्रतिष्ठापना
विधी: हातात अक्षता घेऊन खाल‍ील मं‍त्र म्हणून अक्षता अर्पण कराव्यात.
मं‍त्र: ॐ गणपती देवा! सिद्धी बुद्धीसहीत प्रतिष्ठीत हो.

स्नान:
विधी: गणेशाला प्रथमत: पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते. याला स्नानीय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात.>
महत्त्वाचे: गणेशाची मूर्ती मातीची असल्यास एका पूजेच्या सुपारीत गणेश आहे आहे, असे मानावे. व त्याला स्नान घालावे. मूर्तीवर फक्त हलक्या हाताने पाणी शिंपडावे. सुपारीला ताम्हनात ठेवून खालील क्रिया करा. मंत्र-स्नानीय समर्पण (शुद्ध पाण्याने स्नान): 'हे देवा! गंगाजल जे सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ आहे. त्याने आपल्याला स्नान घालत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा'.
पंचामृत स्नान:
'हे प्रभू! दूध, दही, तूप, मध आणि साखरयुक्त पंचामृताने आपल्याला स्नान घालत आहे. आपण त्याचा स्वीकार करा.' शुद्धोदक स्नान (पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान): 'हे प्रभू! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी उपस्थित आहेत. आपण स्नानासाठी हे जलग्रहण करा.' ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा. (स्नानानंतर शुद्ध वस्त्राने सुपारी किंवा गणेश मूर्तीला पुसून पुन्हा पाटावर ठेवा.)
वस्त्र किंवा उपवस्त्र:
विधी: वस्त्र किंवा उपवस्त्र अशी दोन वस्त्रे अर्पण केली जातात. ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून वस्त्र समर्पित करा.
उपवस्त्र समर्पण: 'हे प्रभू! विविध प्रकारचे चित्र, सुशोभित वस्त्र आपल्याला समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करा किंवा मला यशस्वी होऊ द्या'. ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा. गंध, शेंदूर, दुर्वांकूर, फुले किंवा फुलमाळा.

विधी: गणपतीला रक्त चंदनही अर्पित केले जाते. खालील मंत्र म्हणून गंध, शेंदूर व दुर्वांकूर वहा.
मंत्र: चंदन अर्पण


ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून चंदन अर्पित करा.
(वरील मं‍त्र म्हणून चंदनाचा लेप लावा)
शेंदूर अर्पण
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून शेंदूर अर्पण करा.
(वरील मंत्र म्हणून शेंदूर अर्पण करा)
दुर्वांकूर अर्पण
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून दुर्वांकर अर्पित करा. (दुर्वांकूर अर्पित करा) फुले किंवा हार अर्पण
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून फुले आणि हार अर्पण करा.
(वरील मंत्र म्हणून फुले आणि हार अर्पण करा)

सुगंधी धूप
विधी: पूजेमध्ये मनमोहक सुगंधी अगरबत्ती लावली पाहिजे. अगरबत्ती लावून धूप पसरवा.
मंत्र: उत्तम गंधयुक्त वनस्पतीच्या रसापासून तयार केलेला धूप, जो सर्व देवतांना सुवास घेण्यास योग्य आहे. 'हे प्रभू! हा धूप आपल्या सेवशी समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करावा. ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून धूप समर्पित करा.
(वरील मंत्र बोलून धूप पसरवा)
ज्योती दर्शन
विधी: या विधीसाठी एक दिवा लावून हात धुवा.
मंत्र: 'हे देवा! कापसाच्या वातीने प्रज्वलित दीपक आपल्या सेवेसाठी अर्पण करत आहे. तो त्रैलोक्याचा अंधःकार दूर करणारा आहे. हे दीप ज्योतिर्मय देवा! माझ्या परमात्मा! मी आपणास हा दीपक अर्पण करत आहे. हे नाथा! आपण मला नरक यातनांपासून वाचवा. माझ्याकडून झालेल्या पापांबद्दल मला क्षमा करा.'
ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून दीप प्रज्वलित करा.
(वरील मंत्र बोलून दिव्याचा प्रकाश गणपतीकडे प्रज्वलित करा) (नंतर हात धुऊन घ्या)


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

चाणक्य नीती : अशा स्त्रियांपासून नेहमी लांब राहावे

चाणक्य नीती : अशा स्त्रियांपासून नेहमी लांब राहावे
आचार्य चाणक्याने नीतिशास्त्रात जीवनाच्या विविध पैलू बद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ...

ज्या स्त्रीमध्ये असतात हे 3 गुण त्यांच्या घरात धन येतं

ज्या स्त्रीमध्ये असतात हे 3 गुण त्यांच्या घरात धन येतं
स्त्री असो किंवा पुरुष जर त्यांचे मन स्वच्छ आहे शुद्ध आहे त्यांच्या मध्ये जिद्द आहे ...

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २२

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २२
श्रीगणेशायनमः ॥ जयदेवीनमस्तुभ्यंगिरिजेपावनेशुभें ॥ वाचंस्फूर्तिप्रदेस्मातपाहिमांमंदलसं ...

श्री साईबाबांचे उपदेश

श्री साईबाबांचे उपदेश
श्रीसाईबाबा हे भक्तांना सहज संवादातून बोध करीत. बरेच वेळा त्यांचे बोलणे गूढ व अतर्क्य ...

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २१

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २१
श्रीगणेशायनमः ॥ याध्यातासुखदादेवीं ॥ पुणेंदुमुखपंकजा ॥ शामाशुक्लांबरारेजेनभः ॥ ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...