बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By

राशीनुसार या रंगाच्या गणपतीची पूजा करा

भाद्रपद महिन्याच्या गणेश चतुर्थीला सुखकर्ता विघ्नहर्ता गणपतीची आराधना करण्याची सर्वोत्तम वेळ असते. यादिवशी आपल्या राशीप्रमाणे गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्यास सर्व संकट दूर होऊन घरात सुख नांदतं. पाहूया 12 राश्यांच्या लोकांनी कोणत्या रंगाच्या गणपतीची पूजा करावी.
 
(1) मेष, सिंह, वृश्चिक राशीच्या लोकांनी रक्त वर्ण अर्थातच लाल किंवा शेंदुरी वर्णाच्या गणपतीची पूजा करावी.


 

(2) वृषभ, कर्क आणि तूळ राशीच्या भक्तांनी क्रीम किंवा फिकट पांढर्‍या रंगाच्या गणपतीची पूजा करावी.


3) मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांनी फिकट हिरवा किंवा पिस्ता रंगाच्या गणपतीची पूजा करावी.


4) धनू आणि मीन राशीच्या लोकांनी पिवळ्या किंवा शेंदुरी रंगाच्या गणपतीची पूजा करावी.


(5) मकर आणि कुंभ राशीच्या भक्तांनी निळ्या रंगाच्या गणपतीची आराधना करावी.