आमोद-प्रमोद गणरायाचे ''पद्मालय''
|
| |
या गणेश मंदिराचे बांधकाम पुरातन असून ते कुणी बांधले याबाबतची माहिती अस्तित्वात नाही. मात्र, ते 1200 वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज आहे. मंदिराची सुमारे 35 फूट उंच भिंत एका अखंड पाषाणातून उभारली आहे. कळसावर तसाच अवजड प्रचंड घुमट आहे. मंदिराच्या परिसरातील इतर वास्तूंचे बांधकामही काळ्या पाषाणातूनच केलेले आहे. मंदिरापासून खालील तळ्यापर्यंत याच दगडाच्या पायर्या आहेत.
|
|
|
मंदिरात सुमारे 11 मण वजनाची (440 किलो) पंचधातूची अवाढव्य घंटा आहे. पद्मालयापासून 2 किलोमटीरवर भीमकुंड आहे. येथे भीमाने बकासुराचा वध केल्याची आख्यायिका आहे. मंदिरात दरवर्षी कार्तिक पोर्णिमा, अंगारिका आणि संकष्टी चतुर्थीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते.
कसे जालः पद्मालय येथे जाण्यासाठी जवळचे ठिकाण एरंडोल हे आहे. एरंडोल हे गाव धुळे व जळगाव या रस्त्यावर (सूरत-नागपूर महामार्गावर) आहे. एरंडोलपासून पद्मालयाला जाण्यासाठी दर तासांनी गाडी असते. तर जळगावहून सकाळी सात, नऊ आणि दुपारी 3 वाजता बसची सोय करण्यात आली आहे.
जवळचे रेल्वे स्थानकः जळगाव.
