शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By वेबदुनिया|

मेंढ्याचा गणपती

भंडारा शहरात असलेला भृशुंड गणेश 'मेंढ्याचा गणपती' म्हणून स्थानिक लोकांत प्रसिद्ध आहे. या गणपतीच्या मूर्तीला लांब दाढी आणि मिश्या आहेत. महर्षी भृशुंडीऋषींचा आश्रम या परिसरात होता. त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ते स्वत:च गणपतीरुप झाले ती ही मूर्ती असे या गणपतीबाबत सांगितले जाते. गणपतीचे हे मंदिर काही काळ पूर्णपणे दूर्लक्षित होते. एखाद्या कॉलनीतले हनुमान मंदिर असावे तेवढेच आणि तसचं हे मंदिर होते. पण या गणपतीचे महत्व लक्षात येऊन भक्तांनीं आता या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु केले आहे.