1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 7 एप्रिल 2014 (11:15 IST)

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Loksabha 2014
भारतीय जनता पक्षाने आपला बहुचर्चित जाहीरनामा आज (सोमवार) सकाळी प्रसिद्ध करत, 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चा नारा दिला. जाहीरनाम्याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष व भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला.
काय आहे भाजपच्या जाहीरनाम्यात 
- एससी, एसटी वर्गातील नागरिकांना न्याय मिळेल व त्यांचे सशक्तीकरण होईल अशी योजना.
- ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी विशेष न्यायालये बनवणार
- रोजगार केंद्र, करियर सेंटर बनवणार.
- ग्रामीण व शहरी भारतातील दरी मिटवण्याचा प्रयत्न करू.
- एनडीएच्या कार्यकाळात महागाईचा दर ४.५ टक्के आणि विकास दर ९ टक्के होता. युपीएच्या कार्याकाळात मात्र नेमकी उलटी परिस्थिती होती - मुरली मनोहर जोशी
- वोकेशेनल ट्रेनिंग आणि प्रोफेशनला शिक्षमाला महत्व दिले जाईल. 
- समान नागरी कायद्याचे संरक्षण 
- काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन, कलम ३७० बद्दल सर्वांशी चर्चा करणार.
- घटनेच्या चौकटीत राहून राम मंदिर बांधण्यातचा प्रयत्न करणार.
- शेतक-यांसाठी कृषि रेल्वे मार्ग बनवणार, हाय स्पीड ट्रेन नेटवर्क बनवण्याची योजना.
- कृषि रेल्वे मार्ग बनवणार, हाय स्पीड ट्रेन नेटवर्क बनवण्याची योजना.
- हिमालयाच्या संवर्धनासाठी खास मिशन
- रोजगारात थेट परकीय गुंतवणूक
- अन्न सुरक्षेसाठी विशेष योजना
- टॅक्स व्यवस्थेत अमुलाग्र बदल करणार
- बेटी बचाओ- बेटी पढाओ अभियान
- २०१९ पर्यंत स्वच्छ भारताचे स्वप्न
- शेती विमा योजना आणणाक
- समान नागरी कायद्याचे आश्वासन
- अल्पसंख्यांकांसाठी जाहीरनामा - राष्ट्रीय मदरसा नूतनीकरण, उर्दू भाषेचे संरक्षण व प्रसार, संस्कृतीचे रक्षण