1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 21 एप्रिल 2014 (13:03 IST)

मोदी आहेत मराठी प्रेमी

narendra modi
नरेंद्र मोदी या नावाचं वलय सध्या देशात खूप मोठे दिसत आहे. तरी मोदी यांना एक नेता म्हणून पुढे आणण्यात मराठी भाषिक व्यक्तीचंही तितकंच योगदान राहिलं आहे. मोदींच व्यक्तिमत्त्व हे रा. स्व. संघाने आणि नागपूरने जितकं घडवलं तितकंच मणीनगर मतदारसंघानेही घडवलं. मणीनगर मतदारसंघानेच नरेंद्र मोदींमधील एका प्रचारकाची छबी बदलून त्यांच्यातील नेत्याला पुढे आणलं. मणीनगर येथे मोदींनी संघाची विविध शिबिरे आयोजित केली. या शिबिरांमध्येच संघटनेचे अनेक राष्ट्रीय नेते मोदींच्या संपर्कात आले. त्याकाळी मणीनगर हा प्रदेश मराठी माणसांची संख्या जास्त असलेला प्रदेश होता. या ठिकाणीच मोदींवर मराठी व्यक्तींनी संघनिष्ठेचे संस्कार करण्यात स्वत:च योगदान दिलं. विशेष म्हणजे गेली 12 वर्षे मणीनगर हा नरेंद्र मोदींचा मतदारसंघ राहिला आहे. मराठमोळ्या मणीनगर परिसरात संघविचारांचा दबदबा होता. राजकारणावर जास्त चर्चा होत नसली, तरी तत्कालीन व्यवस्थेला पर्याय शोधण्यावर मात्र वादविवाद झडत असे. या वादविवादात मोदी हे तरुणपणी भाग घेत असत. त्यावेळी कोणाला वाटलंदेखील नव्हतं की हा तरुण भविष्यात देश चालवण्यासाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार आहे. गेल्या काही वर्षात मणीनगरचे स्वरुप बदलले आहे. हा भाग आता

अहमदाबादचा मुख्यभाग झाला आहे. हल्लीच मणीनगरमध्ये उभारलेला दक्षिणी सोसायटी फ्लायओव्हर मोदींनी आपले गुरू, दुसरे सरसंघचालक मा. स. गोळवलकर यांच्या स्मृतींना अर्पण केला आहे. यातूनच मोदींचे मराठी प्रेम हे अजूनही दिसून येते.