सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गोवा विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (16:55 IST)

गोव्याचे 39 आमदार उद्या घेतील शपथ, BJP मुख्यमंत्री चेहर्‍याबद्दल सस्पेंस कायम

ganesh gaonkar
गोवा विधानसभा निवडणुकीत 20 जागा जिंकून भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून दिसून आला आहे. परंतु भाजपच्या मुख्यमंत्री चेहर्‍याबद्दल अजूनही सस्पेंस कायम आहे. भाजप आमदार गणेश गांवकर यांनी राज्य विधानसभेच्या प्रोटेम स्पीकर या रुपात शपथ घेतली परंतु अजून 39 आमदार 15 मार्च रोजी शपथ घेतील.
 
गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले की राज्यपाल द्वारे गणेश गांवकर यांना शपथ देण्यात आली तसेच त्यांनी इतर आमदारांना शपथ देण्यासाठी नियुक्त केले आहे. 39 आमदारांना शपथ घेण्यासाठी 15 मार्च सकाळी 11:30 वाजता सदनमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे.'
 
गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी गणेश गावकर यांना शपथ दिली. दक्षिण गोव्यातील सनवॉर्डेम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे दुसऱ्यांदा आमदार झालेले गावकर मंगळवारी काळजीवाहू सभापती म्हणून काम पाहतील. ते राज्य विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील.