शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गोवा विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (16:17 IST)

मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचा गोव्यातील पणजी मतदारसंघातून पराभव

Goa Election Result: गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असून भाजपला सर्वाधिक जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. मात्र माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर पणजीतून निवडणूक पराभूत झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
 
भाजपने उत्पल यांना पणजीच्या जागेवर तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून जाण्याचा निर्णय घेतला होता. उत्पल यांनी भाजप उमेदवारावर अनेक आरोप केले होते त्यांनी या जागेवरून निवडून येऊ नये असे देखील म्हटले होते. या सीटवर दिवंगत मनोहर पर्रीकर दीर्घकाळ आमदार होते. पणजीतील पराभवानंतर उत्पल पर्रीकर म्हणाले की, 'मी माझ्या लढतीवर समाधानी असून थोडा निराश देखील आहे'. पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपने बाबूश मोन्सेरात यांना तिकीट दिले होते.