शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गोवा विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (14:18 IST)

गोवा विधानसभा निवडणुकीत 78 टक्क्यांहून अधिक मतदान

pramod sawant
गोवा विधानसभेच्या सर्व 40 जागांसाठी मतदान झाले आहे. मात्र मागल्या वेळेच्या तुलनेत यंदा थोडे कमी मतदान झाले. सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी खूपच उत्साहवर्धक होती, मात्र गेल्या वेळी हा आकडा ओलांडता आला नाहीये.
 
गोव्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 78.94% मतदान झाल्याचे सांगितले गेले आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की सांकेलीम मतदारसंघात सर्वाधिक 89.64% मतदान तर उत्तर गोव्यात 79 टक्के तर दक्षिण गोव्यात 78 टक्के मतदान झाले. मात्र, गेल्या 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 81.21% होती.
 
गोव्यात यावेळी भाजप आणि काँग्रेसशिवाय ममता बॅनर्जी यांची टीएमसी आणि अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टीही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत.