सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गोवा विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (20:35 IST)

Exit Polls 2022 : गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची स्पर्धा ,मणिपूरमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलण्याची शक्यता

गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. र या दोन राज्यांच्या एक्झिट पोलचे निकाल येऊ लागले. येत्या 10 मार्च रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे लवकर चित्र दिसून येईल. 
 
एक्झिट पोल सर्वेक्षणात मणिपूरमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. राज्यात भाजपला 23-27 जागा सांगितल्या गेल्या आहेत, तर काँग्रेसला 21-25 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इतर पक्षांना 10-14 जागा मिळण्याची शक्यता आहे. 
 
गोवा विधानसभा निवडणुकीनंतर जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप बहुमताच्या जवळ असल्याचे दिसून आले आहे. त्यात म्हटले आहे की राज्यात भाजपला 17 ते 19 जागा मिळू शकतात, तर गोव्यात बहुमताचा आकडा 21 जागा आहे. दुसरीकडे, काँग्रेस आघाडीला 11-13, आम आदमी पार्टीला 1-3 आणि इतरांनाही 1-3 जागा मिळण्याची शक्यता आहे. 
 
सी-व्होटरच्या एक्झिट पोलनुसार गोव्यात यावेळी त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे. भाजपला 13-17 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला 12-16 आणि एमजीपी आघाडीला 5-9 जागा मिळण्याचा अंदाज आहे. आम आदमी पार्टीलाही 1-5 जागा मिळू शकतात. याशिवाय इतर पक्षांना 0-2 जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे.