शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गोवा विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (15:13 IST)

राहुल गांधींचा दावा, गोव्यात काँग्रेसचे सरकार येणार

गोव्यातील कारचोरम येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संबोधित करताना म्हटले की या निवडणुकीत लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. इतरही पक्ष आहेत मात्र त्यापैकी कोणीही सरकार स्थापन करू शकत नाही. सरकार स्थापन झाले तर काँग्रेस पक्षच स्थापन होईल, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
 
काँग्रेस पक्षाचे जे सरकार स्थापन होणार आहे ते कोणत्याही नेत्याचे, कोणा एका व्यक्तीचे सरकार असू नये, अशी माझी इच्छा आहे असे ते म्हणाले. पण ते सरकार गोव्यातील लोकांचे, गोव्यातील तरुणांचे, गोव्यातील शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार यांचे सरकार असले पाहिजे असेही ते बोलले.

आम्ही जो निर्णय घेऊ तो तुम्हाला विचारल्यानंतर आणि तुमच्याशी बोलून घेऊ.
 
राहुल गांधींनी भाजपवर आरोप करत म्हटले की भाजपने आपल्या जाहीरनाम्यात एकदाही पर्यावरणाचा उल्लेख केलेला नाही. आम्ही गोव्याला कोळसा हब होऊ देणार नाही. यावेळी राहुल गांधी यांनी गोव्यातील लोकांना न्याय योजना गोव्यात लागू करणार असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की आम्ही गोव्यातील गरीब कुटुंबांना महिन्याला 6000 हजार रुपये देऊ. सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के महिलांना आरक्षण देऊ. आम्ही रोजगार निर्मितीसाठी 500 कोटी रुपये ठेवणार. पर्यटन क्षेत्राला पुन्हा एकदा संजीवनी देऊ असे ही ते बोलले.