बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. देव-देवता
Written By
Last Modified: गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (11:49 IST)

घरात का ठेवत नाही शनीची प्रतिमा

हिंदू धर्मात नेमाने पूजा पाठ करण्याचे विशेष विधान आहे. देवाची पूजा केल्याने मनात सकारात्मक भाव उत्पन्न होतो. यासाठी लोक सकाळी आपल्या घरातील देव आणि जवळपासच्या मंदिरात देवाच्या दर्शनाला जातात. घरातील देवघरात बर्‍याच प्रकारच्या देवी देवतांच्या मुरत्या ठेवण्यात येतात. शास्त्रानुसार घरात काही असे देवतांच्या मुरत्या किंवा फोटो ठेवणे वर्जित मानण्यात आले आहे. यातून एक आहे शनीची मूर्ती, ही घरात ठेवणे वर्जित आहे.  
 
शास्त्रानुसार शनीची मूर्ती घराच्या देवघरात नाही ठेवायला पाहिजे बलकी याची पूजा घराच्या बाहेर मंदिरात करण्याचे विधान सांगण्यात आले आहे.  मान्यता अशी आहे की शनीला श्राप मिळाला आहे की ते ज्या कोणाकडे बघतील त्याचे अनिष्ट होईल. शनीची दृष्टीपासून बचाव करण्यासाठी घरात त्यांची मूर्ती नाही लावायला पाहिजे. जर तुम्ही मंदिरात शनीचे दर्शन करण्यास गेले तरी देखील त्याच्या डोळ्यात डोळे घालून न बघता त्याच्या पायाकडे बघून दर्शन करावे. तुम्हाला तरी देखील तुमच्या घरात शनीची पूजा करायची असेल तर त्याचे मनात नाम स्मरण करायला पाहिजे. तसेच शनिवारी शनीसबोत मारुतीची पूजा देखील करायला पाहिजे. याने शनी नक्कीच प्रसन्न होतील.  
 
शनीशिवाय या मुरत्या देखील घरात ठेवू नये  
- राहू-केतूची मूर्ती  
- नटराजची मूर्ती  
- भैरवाची मूर्ती