शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. देव-देवता
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (18:04 IST)

वसंत पंचमी 2021 : वसंत पंचमी साठी विध्यार्थ्यानी काय करावं जाणून घ्या

यंदाच्या वर्षी वसंत पंचमी 16 फेब्रुवारी रोजी येत आहे. 
सरस्वती वसंत पंचमीचे शुभ मुहूर्त -सकाळी 6.59 ते 12.35 पर्यंत
 
वसंत पंचमी सर्वांसाठी महत्त्वाची आहे.या दिवशी विद्यार्थ्यांना देवी सरस्वतीची पूजा आवर्जून करावी. जे लोक सरस्वतीच्या कठीण मंत्राचे जप करू शकत नाही त्यांच्या साठी आई सरस्वतीचे काही सोपे मंत्र सांगत आहोत. वसंत पंचमीला ह्या मंत्राचे जप केल्यानं विद्या आणि बुद्धीत वाढ होते.
 
*  'ॐ शारदा माता ईश्वरी मैं नित सुमरि तोय हाथ जोड़ अरजी करूं विद्या वर दे मोय।' 
 
आई सरस्वतीचे प्रसिद्ध मंदिर मैहर मध्ये आहे. मैहरच्या शारदेला प्रसन्न करण्यासाठीचे मंत्र अशा प्रकारे आहे. 
 
* 'शारदा शारदांभौजवदना, वदनाम्बुजे।
सर्वदा सर्वदास्माकमं सन्निधिमं सन्निधिमं क्रियात्।'
 
शरद ऋतूंमध्ये जन्मलेली कमळाच्या सम मुखाची आणि सर्वांना शुभेच्छा देणारी आई शारदा सर्व समृद्धी घेऊन माझ्या मुखात कायमस्वरूपी राहावं. 
 
* सरस्वतीचा बीजमंत्र 'क्लीं' आहे.शास्त्रामध्ये क्लींकारी कामरूपिण्यै म्हणजे 'क्लीं' कामरूपात पूजनीय आहे.
 
खालील दिलेल्या मंत्राने मनुष्याची वाणी सिद्ध होते. सर्व इच्छा पूर्ण करणारा हा मंत्र सरस्वतीचा सर्वात दिव्य मंत्र आहे.
 
* सरस्वती गायत्री मंत्र : 'ॐ वागदैव्यै च विद्महे कामराजाय धीमहि। तन्नो देवी प्रचोदयात्‌।'
 
या मंत्राची 5 माळ केल्याने देवी सरस्वती प्रसन्न होते आणि साधकाला ज्ञान आणि विद्येचा फायदा मिळायला सुरू होतो. विद्यार्थ्यांना ध्यान करण्यासाठी त्राटक करावं. दररोज त्राटक केल्यानं स्मरणशक्ती वाढते.एकदा वाचन केल्यानं अभ्यास किंवा पाठ कंठस्थ होतो.