शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गुजरात विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (16:55 IST)

AAP उमेदवारांची 11वी यादी जाहीर, केजरीवाल यांचा राजकोटमध्ये रोड शो

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने उमेदवारांची 11वी यादी जाहीर केली आहे. त्यात 12 उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये गुजरात पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेता अल्पेश कथिरियाचाही समावेश आहे. कथिरिया सुरतमधून निवडणूक लढवणार आहेत. गुजरातसाठी आतापर्यंत 130 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. यावरील मतदान अनुक्रमे 1 आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात होणार असून, 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
 
पाटीदार अनामत आंदोलन समितीचे (PAAS) नेते धार्मिक मालवीय यांना सुरतमधील ओलपाड मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. ही जागाही भाजपच्या ताब्यात आहे. आज जाहीर झालेल्या यादीतील अन्य आप उमेदवारांमध्ये बीटी माहेश्वरी (गांधीधाम), एमके बोंबाडिया (दांता), रमेश नभानी (पालनपूर), मुकेश ठक्कर (कांकरेज), लालजी ठाकोर (राधनपूर), राजेंद्रसिंह परमार (मोडासा) आणि उमेश मकवाना (बोटाद), राहुल भुवा (राजकोट पूर्व), दिनेश जोशी (राजकोट पश्चिम), भीमभाई मकवाना (कुटियाना, पोरबंदर) यांचा समावेश आहे.
 
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजकोटमध्ये रोड शो करत आहेत. यावेळी त्यांनी मोरबी पूल दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित केला. सरकार दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. केजरीवाल म्हणाले की, मी पाच वर्षांसाठी संधी मागण्यासाठी आलो आहे. सरकार स्थापन करून काम केले नाही तर पुढच्या वेळी मत मागायला येणार नाही. दरम्यान सरकार आल्यावर मोरबीमध्ये नवीन पूल बांधणार असे केजरीवाल म्हणाले.