गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गुजरात विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (15:49 IST)

गुजरात विधानसभा निवडणूक : तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

gujarat election
केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. गुजरातची दोन टप्प्यात निवडणूक होणार असून नोटिफिकेशनची तारीख- 5 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर असेल. मतदानाची तारीख- 1 आणि 5 डिसेंबर 2022 आहे.
 
8 डिसेंबरला मतमोजणी होईल. याच दिवशी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचीही मतमोजणी होईल.
 
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुजरात निवडणुकांची घोषणा केली. 182 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
निवडणुकीसाठी एकूण 51000 मतदान केंद्रं यासाठी उभारण्यात आली आहेत. त्यातील 34000 केंद्रं ग्रामीण भागात आहेत.
 
तरुण मतदारांसाठी कमी वयाचे कर्मचारी तैनात असणार आहेत. तसंच या निवडणुकीसाठी अतिरिक्त निरीक्षक नेमण्यात येणार आहे.
 
तृतीयपंथी समाजातील मतदारांना मतदान करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं. यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचं ते पुढे म्हणाले.
गुजरात मध्ये सध्या 4 कोटी 90 लाथ 89 हजार 765 मतदार आहेत. त्यात 2 कोटी 53 लाख 36 हजार 610 पुरुष आहेत तर महिलांची संख्या 2 कोटी 37 लाख 51 हजार 738 आहे.
 
नवीन मतदारांची संख्या 11 लाख 62 हजार आहे. अहमदाबादमध्ये सगळ्यात जास्त मतदार आहेत कर डांग भागात सर्वात कमी मतदार आहेत.
 
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने 99 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेस ने 77 जागा जिंकव्या होत्या. एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आहे.
 
ही निवडणूक दोन टप्प्यात झाली होती.
 
गुजरात निवडणुकीत यावेळी काय नवीन दिसेल?
गुजरात विधानसभा मध्ये एकूण 182 जागा आहेत. त्यापैकी 13 जागा अनुसूचित जातीसांठी तर 27 जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. 2002 मध्ये 15 व्या विधानसभा निवडणुकीसाठी 182 जागांवर हे शेवटचं मतदान आहे. त्यानंतर तिथे जागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
 
सँपल रजिस्ट्रेशन सर्व्हेनुसार गुजरातची 55 टक्के लोकसंख्येचं वय 30 पेक्षा कमी आहे. त्यात 57 टक्के जनता ग्रामीण भागात आणि 53 टक्के जनता शहरी भागात राहते. या लोकसंख्येने त्यांच्या आयुष्यात बहुतांशवेळा भाजपचंच सरकार पाहिलं आहे.
 
या निवडणुकीत 80 वर्षं किंवा अधिक वयाचा मतदार असेल आणि काही कारणामुळे ते तिथे पोहोचू शकले नाही तर त्यांना घरबसल्या मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल.
 
गुजरात मध्ये निवडणुकीचे मुद्दे कोणते आहे?
गुजरातमध्ये भाजपा आणि काँग्रेस हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. मात्र यावेळी आम आदमी पार्टी आणि ओवैसी यांचा पक्ष निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकांचं समीकरण बदलण्याची शक्यता आहे. मात्र राजकीय निरीक्षकांच्या मते गुजरातमध्ये मुख्य लढाई भाजपा आणि काँग्रेसमध्ये होईल.
 
राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रा करत आहे. त्यात गुजरात आणि हिमाचल प्रदेश हे राज्य नाहीत. ते निवडणुकांचा प्रचार करणार की नाही हेही अजून निश्चित नाही. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं गृहराज्य असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
 
भूपेंद्र पटेल यांच्यासाठीही कसोटी आहे. तसंच काँग्रेस सोडून भाजपमध्ये सहभागी होणाऱ्या अल्पेश ठाकोर यांचं राजकीय भविष्य याच निवडणुकीत ठरण्याची शक्यता आहे.
 
वडगाममध्ये अपक्ष दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे.
 
हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान
गुजरातबरोबर हिमाचल प्रदेशातही 68 जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. 12 नोव्हेंबरला हिमाचलमध्ये मतदान होईल. तिथे मतमोजणी 8 डिसेंबरला होईल.
 
हिमाचलमध्ये एकूण 55 लाख मतदार आहेत. त्यात 1.86 लाख मतदार पहिल्यांदा मत देत आहेत.
 
गेल्यावेळी हिमाचल प्रदेशात नऊ नोव्हेंबरला मतदान झालं होतं.
 
Published By- Priya Dixit