गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

कांदे पराठा

कांदे पराठा गव्हाचे पीठ कांदे तेल
MHNEWS
साहित्य : गव्हाचे पीठ दोन वाट्या, तीन कांदे, तेल, एक चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला.

कृती : गव्हाच्या पीठात तेल व मीठ घालून नेहमीच्या पोळ्यांसारखी कणीक मळून घ्यावी. तेल थोडे जास्त घालावे. कांदे बारीक चिरून घ्यावेत. त्यात तेल, मीठ, लाल तिखट व गरम मसाला घालून मिश्रण तयार करुन घ्यावे. भिजवलेल्या कणिकेचा लिंबाएवढा गोळा करून त्याची लाटी करावी. त्यात मावेल एवढे कांद्याचे मिश्रण घालून ती बंद करावी व जाडसर लाटून नॉन स्टीक तव्यावर भाजून घ्यावी. भाजताना दोन्ही बाजूला कडेने तेल सोडावे म्हणजे पराठा खरपूस भाजला जातो. लोणी किंवा दह्याबरोबर गरम गरम सर्व्ह करावा.

साभार : महान्यूज