कृती : दह्याला 3- 4 तास पातळ कपड्यात बांधून लटकवून ठेवावे. पाणी पूर्ण निथळल्यावर त्या मिश्रणाला एका भांड्यात काढून त्यात साखर घालून चांगले एकजीव करून घ्यावे. नंतर त्या मिश्रणाला चाळणी किंवा बारीक कपड्याने चाळून घ्यावे. गुलकंदामध्ये 2 चमचे गुलाबाच्या पाकळ्या घालून चांगले मिक्स करून दह्याच्या मिश्रणात टाकावे. सर्व्ह करताना उरलेल्या पाकळ्या सजवून सर्व्ह करावे.