शनिवार, 3 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

गुळपापडी

गुळपापडी कणीक
MHNEWS
साहित्य : २ वाट्या जाडसर कणीक, १ वाटी साजूक तूप, १ वाटी मऊ गूळ, थोडे तीळ, खसखस आणि बडीशेप.

कृती : तूप गरम करून कणीक घालून खमंग भाजावे. गॅस बंद करुन खाली उतरवल्यावर गूळ घालावा. गूळ विरघळला की मिश्रण थापावे. त्यावर तीळ पेरावे. वाटीने दाबावे. लगेच वड्या पाडाव्या. मुलांसाठी या वड्या पौष्टिक आहेत.