साहित्य : 2 कप मैदा, 2 मोठे चमचे तेल, 1 कप उकळलेली चणा डाळ, 1 लहान चमचा मोठी वेलचीचे दाणे, 8-10 मनुका, खजूर, काजू काप केलेले, 2 मोठे चमचे खोबऱ्याचा किस, 2 मोठे चमचे खवा किंवा मिल्क पावडर, 1/2 कप साखर, तळण्यासाठी तूप.
कृती : मैद्यात तेलाचे मोहन घालून कणीक चांगली मळून घ्यावी. डाळीला जाडसर वाटून त्यात बाकी सर्व साहित्य घालून 1 चमचा तुपात भाजून त्यात साखर मिसळावी. मैद्याचे लहान लहान गोळे तयार करून लाटून त्यात तयार केलेले सारण भरून करंजीचा आकार द्यावा व तुपात खमंग तळून घ्यावे.