तूरीच्या डाळीची खिचडी
|
कृती : कुकरमध्ये तूप साधरण 3 मिनिटे गरम करून त्यात मोहरी घाला. तडतडताच जिरे, दालचिनी, लवंगा, मिरच्या, काळी मिरी आणि कढी पत्ता घाला. काही सेकंद ढवळा. पाणी, हळद, मीठ घाला आणि ढवळा. तांदूळ आणि तूर डाळ घाला. कुकर बंद करून 3 मिनिटे शिजवा. थंड झाल्यावर गरम गरम वाढा.
