साहित्य : चार लीटर दूध, पाऊण वाटी तांदूळ, दीड वाटी साखर, दहा-बारा वेलदोडे, अर्धे जायफळ, बदाम, केशर, चारोळी. कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन, दुधात घालून, दूध आटवत ठेवावे व ते सारखे हालवत राहावे. दूध आटवून निम्मे करावे. नंतर खाली उतरवून थोडे गार झाल्यावर त्यात साखर, वेलचीची पूड, बदामाचे काप व जायफळ उकळून घालावे. हवे असल्यास थोडे केशर घालावे. वर चारोळी पसरावी.