Dharma Sangrah

भाजीचे मुठिया

साहित्य : पाऊण किलो चण्याच्या डाळीचे पीठ, कोबी पाव किलो, दुधी भोपळा पाव किलो, गाजरे पाव किलो, ओल्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, ओले खोबरे, तीळ, मोहरी, मेथी, जिरे, हिंग, हळद, धने, लिंबू, साखर.

कृती: भाज्या धुऊन किसाव्यात. चण्याच्या पिठात किसलेल्या भाज्या घालाव्यात. तसेच ओल्या मिरच्या वाटून, कोथिंबीर, धन्या-जिर्‍याची पूड, हळद, साखर व मीठ हे सर्व जिन्नस अंदाजाने व चवीपुरते घालावेत. लिंबाचा रस पिळावा व जरूर लागल्यास थोडे पाणी घालून पीठ भिजवावे आणि थोडे तेल घालून पीठ चांगले मळावे. नंतर पिठाचे लहान लहान मुटके करून, मोदकपात्रात ठेवून, उकडून घ्यावेत. थंड झाल्यावर त्यांचे जाड काप कापावेत. हिंग, मोहरी व मेथीची फोडणी करून ती त्या कापांवर घालावी. काप खाली-वर करून फोडणी सगळीकडे लागेल, असे करावे. नंतर यावर कोथिंबीर व खोबरे पसरावे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Saffron Rose Biryani Recipe अतिशय शाही, सुगंधी आणि चवदार केशर गुलाब बिर्याणी

नियमित मल्टीविटामिन घेणे योग्य आहे की अयोग्य तज्ज्ञ काय सांगतात

१२ वी नंतर 'सप्लाय चेन मॅनेजमेंट'मध्ये करा दमदार करिअर; जाणून घ्या पात्रता, टॉप कॉलेज आणि पगार!

चष्म्याचे डाग नाकावरून काढण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments