गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

गुजराती स्पेशल : तिळ पापडी

साहित्य - चार वाट्या डाळीचे पीठ, एक टे. स्पू. ओवा, दोन टे. स्पू. तीळ, दोन टे.स्पू किसलेले सुकं खोबरं, तेल, तिखट-मीठ चवीनुसार.

कृती - डाळीच्या पिठात वरील सर्व साहित्य घालून पाण्याने मिश्रण भिजवून ठेवा. १५-२0 मिनिटांनी पीठ चांगले मळून सोर्‍यामधील पापडीच्या साच्यात घालून चकलीप्रमाणे तेलात सोडून तळून घ्या. या आगळीवेगळी चटपटीत पापड्या खाण्यास तयार आहेत