शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
Written By

पंजाबी समोसा

साहित्य : अर्धा किलो मटरचे दाणे, ३-४ फ्लॉवरची फुले, अर्धे छोटे लिंबू, ७-८ मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, कोथिंबिर, १ चमचा धने-जिरे पावडर, १ चमचा तिखट, हळद, हिंग, मीठ, साखर, २ वाट्या मैदा, तळण्यासाठी तेल. कूकरमध्ये मटरचे दाणे व बटाटा शिजवावे, नंतर मैद्यात तिखट, धनेजीरे पूड, थोडी हळद व हिंग, भाजलेले तीळ, चवीपुरते मीठ, चिरलेली कोथिंबीर व अर्धी वाटी तेल गरम करून त्यावर ओतावी. हे सर्व मिश्रण कालवून मैदा घट्ट भिजवावा आणि तो २ तास मुरवत ठेवावा.

बटाटे कुस्करून घ्यावेत. फ्लॉवरची फुले बारीक चिरावी. त्यानंतर मटार, कुस्करलेला बटाटा, चिरलेला कांदा लसूण, मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, चिरलेले फ्लॉवर यामध्ये थोड लाल तिखट, हळद, हिंग, धनेपूड, चवीप्रमाणे मीठ व लिंबू पिळून सर्व मिश्रण परत एकसारखे कालवून घ्यावे.

भिजवलेल्या मैद्याचा छोटा गोळ घेऊन सर्वात पातळ व मोठी पोळी लाटावी. या पोळीचे तीन भाग करावे. तीन पट्ट्यांवर मटारचे केलेले सारण घालून खणासारखी त्रिकोणी घडी करावी. याप्रमाणे सर्व समोसे करून घेतल्यानंतर गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तेलात तेळावे.