शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By वेबदुनिया|

मैसूर पाक

साहित्य : 200 ग्रॅम बेसन, 200 ग्रॅम साखर, 350 ग्रॅम तूप.

कृती : बेसन आणि चार मोठे चमचे तूप मिसळावे आणि त्याला चांगल्याप्रकारे परतावे. खाली काढून वेगळे ठेवावे. साखरेत एक कप पाणी टाकून पातळ चाशनी बनवावी. साखरेची चाशनी तयार झाल्यानंतर कमी आच करून थोडे भाजलेले बेसन मिसळून सारखे हालवावे. ह्याच प्रकारे सर्व बेसन संपेपर्यंत हिच प्रक्रिया करावी. नंतर मिश्रणाला हालवत थोडे-थोडे करून सर्व तूप टाकून द्यावे. आंचेवरून काढून तूप लावलेल्या ट्रेमध्ये टाकावे आणि त्याला समातलं करावे. मिश्रण थंडे झाल्यावर मनासारख्या आकारात कापावे. जास्तीचे तूप वेगळे करून घ्यावे.