शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

भुट्टयाची भेलपूरी

साहित्य : 3-4 कप उकळलेले भुट्‍ट्याचे दाणे, 3 बटाटे, कांदे उकळलेले, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं, मीठ, तिखट, 2 चमचे लिंबाचा रस, धने पूड, हिंग, 1/2 बारीक शेव, सजावटीसाठी नारळाचा भुरा. 
 
कृती : भुट्ट्याचे उकळलेले दाणे व बटाटेचे काप करून ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात हिंग व जिरं घालून फोडणी द्यावी, नंतर चिरलेले कांदे, टोमॅटो घालून चांगले परतून त्यात बटाटे, भुट्टाचे दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर, लिंबाचा रस टाकावा. 5 मिनिट शिजवावे. सर्व्ह करताना वरून शेव व नारळाचा भुरा टाकावा.