कृती : सर्वप्रथम पुऱ्यांचे लहान लहान तुकडे करावे. एका मोठ्या भांड्यात शेव, लाह्या आणि पुऱ्यांचे तुकडे ठेवावे. त्यात बटाटा व कांदा मिक्स करावा. नंतर हिरवी व गोड चटणी त्यात घालावी. चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घालून लिंबाचा रस घालावा. सर्व्ह करताना कोथिंबिरीने सजवून द्यावे.