मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

मसाला भेंडी

मसाला भेंडी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 2 कापलेले कांदे, 1 चमचा अद्रक पेस्ट, 1 चमचा लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा नारळाचा कीस, 1 चमचा तीळ, 1 चमचा मीठ, 1 चमचा धने पूड, 1 चमचा तिखट, 5 मोठे चमचे तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा मेथी, पाव चमचा कलौंजी, 3 कढी पत्ते, 500 ग्रॅम कापलेली भेंडी.

कृती : कांदे, लसूण, अद्रक, हळद, नारळ, तीळ, मीठ, धने व मिरची यांची पेस्ट तयार करावी. तेल गरम करून त्यात मोहरी, मेथी, कढी पत्ते आणि कलौंजी फ्राय करावे. नंतर दळलेला मसाला टाकून तीन मिनिट फ्राय करावे. भेंडी घालून 4-5 मिनिट फ्राय करावे. सर्विंग डिशमध्ये काढून पराठ्यांसोबत गरम गरम वाढावे.