साहित्य : एक जुडी मेथीची कोवळी भाजी, तीन वाट्या कणीक, एक वाटी चण्याच्या डाळीचे पीठ, ओल्या मिरच्या, लसूण, मीठ, चवीला साखर, तेल, हळद. कृती : मेथीची भाजी धुऊन, चिरून घ्यावी. त्यात कणीक, डाळीचे पीठ, मिरच्या व लसूण वाटून, हळद, चवीप्रमाणे मीठ, साखर व तेल घालावे व पोळ्यांच्या कणकेप्रमाणे पीठ भिजवावे. नंतर त्याची लिंबाएवढी गोळी घेऊन पातळ लावावे व तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूंनी पोळीप्रमाणे भाजावे. ठेपला फुगत नाही. हे ठेपले दहा-पंधरा दिवस टिकतात. प्रवासात बरोबर नेण्यास उपयोगी आहेत. खावयास खमंग लागतात.