शनिवार, 10 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

रवा-नारळ लाडू

कीर्ती मोहरील

रवा नारळ लाडू पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : अर्धा किलो बारीक रवा, दीड वाटी नारळाचा चव, पाऊण किलो साखर, पाव किलो साजूक तूप, चारोळी.

कृती : सर्वप्रथम कढईत थोडं तूप गरम करुन घ्या. रव्यावर घालून नीट लावून मग उरलेलं तूप गरम करून, त्यात रवा छान भाजून घ्या. साखरेच्या निम्मं पाणी घालून पाक करा. पाक एक तारीहून जरा जास्त ठेवा. पाकात रवा, नारळ मिश्रण घातल्यावर सारखं हलवत राहा. सुरवातीला मिश्रण सैलसर दिसलं पाहिजे म्हणजे २-३ तासांनी ते व्यवस्थित होतं. गार झाल्यावर चारोळी इत्यादी घालून लाडू वळा. या लाडवांचा रंग बदामी येतो.