पगार दिला नाही! संतप्त झालेल्या कर्मचाऱ्याने स्फोटके आणि मोबाईल फोनची चोरी केली
नागपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. न मिळालेल्या वेतनामुळे मोबाईल फोन आणि स्फोटकांची चोरी झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
महाराष्ट्रातील नागपूर येथे गेल्या बुधवारी एका कोळसा खाण कामगाराला अटक करण्यात आली. त्याने आपल्या कामाच्या ठिकाणाहून तीन मोबाईल फोन आणि दोन स्फोटके चोरल्याचा आरोप आहे. आरोपी, ३५ वर्षीय राजेंद्र रामलाल विश्वकर्मा याने पोलिसांना सांगितले की, त्याला वेतन न मिळाल्याने त्याने ही चोरी केली.
आरोपी राजेंद्र हा छत्तीसगडमधील बालोदचा रहिवासी आहे. राजेंद्र हा वरोरा येथील डब्ल्यूसीएल कोळसा खाणीत कामगार होता. त्याने पोलिसांना सांगितले की, कंत्राटदाराने त्याला वेतन दिले नव्हते. यामुळे संतापलेल्या राजेंद्रने कंत्राटदाराचे तीन मोबाईल फोन चोरले आणि खाणीच्या परिसरातून दोन स्फोटके घेऊन पसार झाला.
Edited By- Dhanashri Naik
