गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By
Last Updated : रविवार, 21 जुलै 2024 (10:43 IST)

गुरु पौर्णिमा 2024 : या दिवशी काय करावे आणि काय करू नये

guru purnima
Guru Purnima 2024 : भारतवर्षात गुरु पौर्णिमेचे पवित्र पर्व मोठी श्रद्धा व उत्साहात साजरे करतात. आषाढ शुक्ल पौर्णिमाला गुरु पौर्णिमा म्हणतात. तसेच यादिवशी गुरु पूजा करण्याचे महत्व आहे. तसेच चारही वेदांचे प्रथम व्याख्याता महर्षि वेद व्यास यांचे पूजन गुरु पौर्णिमा दिवशी केले जाते. तर चला जाणून घेऊ या या दिवशी काय करावे आणि काय करू नये.
 
गुरु पौर्णिमा दिवशी काय करावे : 
 
- गुरु पौर्णिमा दिवशी महर्षि वेद व्यास यांच्या समोर तुपाचा दिवा लावावा, सोबत भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी.
- पिंपळाच्या झाडाला जल चढवून तुपाचा दिवा लावावा आणि श्री‍हरि विष्णूंचे ध्यान करावे.
- पितरांच्या नावाने तर्पण करावे.
- आज श्रीमद्‍भागवदगीताचा पाठ करावा.
- सत्यनारायणाची पूजा घालून कथा वाचावी.
- गुरु पौर्णिमाचा दिवस विद्या किंवा सिद्धिच्या दृष्टीने खूप चांगला असतो, तसेच या दिवशी काहीतरी नवीन चांगले शिकण्यास सुरवात करावी.
- केशरचा टिळक लावावा.
- मंदिरात पिवळ्या वस्तू दान कराव्या.
- गुरूंकडून गुरुमंत्र घ्यावा.
- पिवळ्या पदार्थांचे सेवन करावे.
- घरातील मोठे व्यक्ती, गुरु, शिक्षक यांचा आशीर्वाद घ्यावा.
- गुरु पूजनाने बृहस्पति दोष समाप्त होतो. तसेच देवगुरु बृहस्पति यांचे पूजन व मंत्र जप करावा. 
- गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरूदेवो महेश्वरः। गुरुः साक्षात परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ या मंत्राचा जप करावा.
 
काय करू नये :
- कोणत्याही प्रकारचे मांगलिक कार्य करू नये.
- क्रोध, ईर्ष्या, कोणाचाही अपमान करू नये.
- मांस, मटन, दारू यांपासून दूर राहावे.
- या दिवशी स्त्री अथवा पुरुषाने कामवासना मनात आणू नये. 
- कोणत्याही प्रकारचे तामसिक भोजन करू नये.
- यात्रा करू नये.
- सुख सुविधांचा त्याग करावा.
- जर तुम्ही गुरु पौर्णिमाचे व्रत ठेवले असेल तर कोणाशीही वाद घालू नका.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik