शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By
Last Updated : रविवार, 21 जुलै 2024 (10:48 IST)

गुरु पौर्णिमा 2024 : हनुमानजी आहे सर्वात मोठे गुरु, जाणून घ्या कसे

hanumanji
गुरु पौर्णिमा 2024 : कोणाचा गुरु होण्यासाठी त्यांचे शिष्य देखील असले पाहिजे. तसेच हनुमानजींचे तर कोणी शिष्य नव्हते मग ते कोणाचे गुरु झाले आणि कसे ते सर्वात मोठे सद्गुरू बनले. तर चला जाणून घेऊ या संबंधित काही रोचक गोष्टी. 
 
1. गुरूचा अर्थ : हनुमानजी अनेक जणांचे गुरु होते ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी सर्वात आधी हे जाणणे गरजेचे आहे की, गुरु या शब्दाचा अर्थ काय आहे? 'गु' शब्दाचा अर्थ आहे अंधकार(अज्ञान) आणि 'रु' शब्दाचा अर्थ आहे प्रकाश ज्ञान. अज्ञानाला नष्ट करणारा जो ब्रम्हरूप प्रकाश आहे, तो आहे गुरु. याकरिता गुरु ब्रम्हज्ञानी असणे गरजेचे आहे. ब्रम्हज्ञानीच्या चेहऱ्यावर तेज असते. 
 
2. हनुमानजींनी विभीषणला मार्ग दाखवला- 
विभीषण श्रीरामांचे भक्त होते. जेव्हा हनुमानजींनी पहिल्यांदा लंकेमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांना समजले की रावणाच्या नगरीमध्ये श्रीरामांची भक्ती करणारे कोणीतरी आहे आणि ते आहे विभीषण. हनुमानजींनी विभीषणला मार्ग दाखवला आणि विभीषण यांचे गृ बनून त्यांची भेट श्रीरामांशी घडवून आणली. असे सांगण्यात येते की, हनुमानजींची पहिली स्तुती विभीषण यांनीच केली होती.
 
3. अर्जुन आणि भीमाचे गुरु- 
महाभारत काळात हनुमानजींनी भीम आणि अर्जुनाचा अहंकार दूर करून श्रीरामांचा महिमा सांगितला होता. नंतर हनुमानजींनी दोघांना योग्य मार्गदर्शन करून महाभारत युद्धात विजय प्राप्त करून दिला होता. हनुमानजी स्वतः अर्जुनच्या ध्वजावर बसून युद्ध लढले होते. त्यांनी श्रीकृष्णाच्या सांगण्यावरूनच सत्यभामा, गरुड, बलराम, चक्र यांचा अहंकार नष्ट केला होता. 
 
4. माधवाचार्य- कलियुगामध्ये हनुमानजींनी श्रीरामाचे परमभक्त माधवचार्य यांना साक्षात दर्शन देऊन प्रभू श्रीराम यांचा मार्ग सांगितला होता.
 
5. संत तुलसीदास- 
तुलसीदास यांचे गुरु बनून हनुमानजींनी त्यांची श्रीरामांशी भेट घालून दिली होती. हनुमानजींनकडून प्रेरणा घेऊन तुलसीदासांनी रामचरित मानसची रचना केली होती. 
 
6. समर्थ रामदास- 
हनुमानजींचे परमभक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास यांना हनुमानजींचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला होता. हनुमानजींपासून प्रेरणा घेऊन त्यांनी देशात कुस्तीच्या आखाड्यांची निर्मिती केली. तसेच आजही देशामध्ये सर्व पहिलवान लोक हनुमानजींना आपला गुरु मानतात. 
 
7. ज्यांचे कोणीही नाही त्यांचे गुरु हनुमान-
असे म्हणतात की जर तुम्हाला गुरु नसेल तर तुम्ही हनुमानजींना आपला गुरु बनवू शकतात. सुखदुःखात हनुमानजी तुमच्या सोबत राहतील. हनुमानजींचे अनेक शिष्य होते कोणी वनवासी होते तर कोणी आदिवासी होते.
 
8. हनुमानजींचे गुरु- 
सूर्य, नारद, मातंग ऋषी देखील हनुमानजींचे गुरु होते. अशी आख्यायिका आहे की, मातंग ऋषींच्या आश्रमातच हनुमानजींचा जन्म झाला होता. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik