सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जय हनुमान
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (17:20 IST)

हनुमान जन्मोत्सव: राशीनुसार हे करा, घरात अफाट संपत्ती येईल

hanuman jayanti rashi
हनुमान जन्मोत्सवानिमित्त जाणून घेऊया, तुमच्या राशीनुसार या दिवशी कोणती पूजा करणे शुभ आहे.
मेष : एकमुखी हनुमंत कवच पाठ करा आणि हनुमानाला बुंदी अर्पण करून गरीब मुलांमध्ये वाटून द्या.
 
वृषभ : रामचरितमानसातील सुंदर-कांड वाचा आणि हनुमानाला गोड पोळी अर्पण करून वानरांना खाऊ घाला.
 
मिथुन : रामचरितमानसातील अरण्य-कांड वाचा आणि हनुमानाला विडा अर्पण करून गायीला खाऊ घाला.
 
कर्क : पंचमुखी हनुमंत कवच पाठ करून हनुमानाला पिवळे फूल अर्पण करून ते पाण्यात वाहून द्यावे.
 
सिंह : रामचरितमानसातील बालकांड वाचून हनुमानाला गुळाची पोळी अर्पण करून भिकाऱ्याला खाऊ घाला.
 
कन्या : रामचरितमानसच्या लंका-कांडाचा पाठ करा आणि हनुमान मंदिरात शुद्ध तुपाचे 6 दिवे लावा.
 
तूळ : रामचरितमानसातील बालकांड वाचा आणि हनुमानाला खीर अर्पण करून गरीब मुलांमध्ये वाटून घ्या.
 
वृश्चिक : हनुमान अष्टकाचा पाठ करा आणि हनुमानाला गुळाचा तांदूळ अर्पण करून गायीला खाऊ घाला.
 
धनु : रामचरितमानसातील अयोध्याकांड वाचून हनुमानाला मध अर्पण केल्यावर प्रसाद स्वरूपात स्वतः खा.
 
मकर : रामचरितमानसातील किष्किंधा-कांड पाठ करा आणि हनुमानजींना मसूर अर्पण करून मासोळ्यांना खायला द्या.
 
कुंभ : रामचरितमानसातील उत्तरकांड वाचा आणि हनुमानजींना गोड पोळ्या अर्पण करून म्हशींना खाऊ घाला.
 
मीन: हनुमंत बाहुकचा पाठ करा आणि हनुमानजीच्या मंदिरात लाल रंगाचा ध्वज किंवा चिन्ह अर्पण करा.