शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जय हनुमान
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (08:58 IST)

Hanuman Janmotsav : मारुतीला या 10 उपायांनी करा प्रसन्न, संकट दूर होऊन सुख मिळेल

Hanuman
Hanuman Janmotsav : कलयुगात हनुमानाची भक्ती सांगितलेली आहे. हनुमानाचे सतत उपासना केल्याने भक्त भूत- पिशाच, शनी आणि ग्रह बाधा, रोग आणि शोक, कोर्ट-कचेरी-कारागृहाच्या बंधनातून मुक्तता, मृत्यू-संमोहन-उत्साह, घटना-अपघात टाळणे, मंगल दोष, कर्जमुक्ती, बेरोजगारी आणि तणाव किंवा चिंता यापासून मुक्ती मिळते. तुम्ही हनुमंताला या प्रकारे प्रसन्न करु शकता-

1. हनुमान चालीसा पाठ : दररोज हनुमान चालीसा पाठ करावा. एकाच जागेवर बसून पाठ करावा.

2. दिवा लावा : दररोज हनुमानाजवळ तीन कोपरे असलेला दिवा लावावा. दिव्यात चमेलीचे तेल घालावं.

3. चौला अर्पण करा: हनुमानजींना चौला अर्पण करा, बीडा अर्पण करा आणि गूळ आणि हरभरा प्रसाद द्या.

4. मंत्र जप करा : 'ॐ श्री हनुमंते नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जाप करा किंवा साबरमंत्र सिद्ध करा.

5. पाठ करा : महिन्यातून एकदा सुंदरकांड आणि बजरंगबाण पाठ करावा.

6. कडा घाला : सिद्ध केलेला हनुमानाचा कड़ा घालावा. हा कडा पितळाचा असावा.

7. नैवेद्य अर्पित करा : हनुमानाला मंगळवार, शनिवार किंवा हनुमान जयंतीला केशरी बूंदीचे लाडू, इमरती, बेसनाचे लाडू, चूरमा, मालपुआ किंवा मलई-खडीसाखराचे लाडू यांचा नैवेद्य दाखवावा.

8. पूजा करावी : हनुमानाजींसोबत प्रभू राम, लक्ष्मण आणि जानकी माता यांची देखील पूजा करावी.

9. उपास करावा : प्रत्येक मंगळवारी उपास करुन विधीपूर्वक हनुमानाची पूजा करावी. जर तुम्हाला हनुमानजींची मनोभावे भक्ती करायची असेल, तर तुम्ही मांस, मद्य आणि सर्व प्रकारची व्यसनं सोडून ब्रह्मचर्य पाळून हनुमानजींची पूजा करावी किंवा त्यांच्या मंत्राचा किंवा नामाचा रोज विधिपूर्वक जप करावा.

10. विडा अर्पण करा: जर तुमची बिकट परिस्थिती असेल किंवा तुम्हाला आपले कोणते काम अडकलेले असेल तर हनुमानजींना विडा अर्पण करा आणि त्यांना प्रार्थना करा की आता तुम्ही स्वतः हा पुढाकार घ्यावा.