सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: रविवार, 25 एप्रिल 2021 (09:08 IST)

हनुमान जन्म कथा

हनुमंताला महादेवांचा 11वा रूद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं आणि ते प्रभु श्री रामाचे उत्कट भक्त आहेत. हनुमान जींचा जन्म वानर जातीमध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव अंजना (अंजनी) आणि वडील वानराज केसरी असे आहे. यामुळे त्यांना आंजनाय आणि केसरीनंदन या नावाने देखील ओळखलं जातं.
 
सूर्याच्या वरातून सुवर्ण निर्मित सुमेरु येथे केसरीचे राज्य होते. त्यांची अती सुंदर अंजना नावाची स्त्री होती. एकदा अंजना यांनी शुचिस्नान करुन सुंदर वस्त्राभूषण परिधान केले. त्यावेळी पवन देवाने त्यांच्या कर्णरंध्रात दाखल होऊन आश्वस्त केले की आपणास सूर्य, अग्नि आणि सुवर्णासारखा तेजस्वी, वेदज्ञाता, महाबली पुत्र प्राप्त होईल आणि तसेच घडले.
 
अंजनाच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. दोन प्रहरानंतर सूर्योदय होताच त्याला भूक लागली. आई फळं घेण्यास गेली तर इकडे लाल वर्णाच्या सूर्याला फळ समजून हनुमानाने त्याला धरण्यासाठी आकाशात उडी मारली.
 
त्या दिवशी आमावस्या असल्यामुळे सूर्याचा ग्रास करण्यासाठी राहू आला होता परंतू हनुमानाला दुसरा राहू समजून त्याने पळ काढला. तेव्हा इंद्राने हनुमानाने वज्र-प्रहार केला याने त्यांची हनुवटी वक्र झाली तेव्हा पासून ते हनुमान म्हणून ओळखले जातात.
 
इंद्राच्या या दृष्टपणाला शिक्षा देण्यासाठी पवन देवाने प्राण्याचे वायु संचलन थांबविले. तेव्हा ब्रह्मादि सर्व देवतांनी हनुमानास वर दिले. 
 
ब्रह्मांनी अमितायु, इंद्राने वज्राने पराभूत न होण्याचा, सूर्याने आपल्या शतांश तेज युक्त आणि संपूर्ण शास्त्र तज्ञ असण्याचा, वरुणांनी पाश आणि पाण्यापासून अभय राहण्याचा, यमाने यमदंडाने अवध्य आणि पाशने नष्ट न होण्याचा, कुबेरांनी शत्रुमर्दिनी गदाने निःशंख राहण्याचा, शंकराने प्रमत्त आणि अजेय योद्धांवर विजय प्राप्त करण्याचा आणि विश्वकर्माने मयद्वारे निर्मित सर्व प्रकाराचे दुर्बोध्य आणि असह्य, अस्त्र, शस्त्र व यंत्रादिने काहीही क्षती न होण्याचं वर दिलं.
 
या सर्व प्रकरांच्या वर प्राप्तीमुळे हनुमान यांनी अमित पराक्रम केले जे जगप्रसिद्ध आहे.