सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Updated: शनिवार, 17 एप्रिल 2021 (15:54 IST)

बोध कथा : भगवंतानेही आपल्या खिश्यात एक चिठ्ठी ठेवली

एक दहा बारा वर्षाचा मुलगा उन्हाळ्याच्या सुटीत आईबाबा बरोबर त्याच्या आजी आजोबाकडे जायाचा..हा नेम कायम सुरू होता, एकदा तो मुलगा बाबांना म्हणतो बाबा आता मी मोठा झालोय..मला सगळं समजत..या वर्षी मी एकट्याने प्रवास करणार आणि आजीकडे जाणार.बाबा त्याची हरप्रकारे समजूत काढतात पण तो पठ्ठ्या यावेळेला काही ऐकत नाही..शेवटी सर्व सुचना देऊन बाबा एकदाचे तयार होतात.
 
स्टेशनला त्याला गाडीत बसवून द्यायला ते येतात..खूप सुचना करतात. नीट जा. पहिल्यांदा एकटा जातोय. गाडी सुटायच्या अगोदर ते त्याच्या खीशात एक चिठ्ठी टाकतात आणि त्याला सांगतात की हे बघ तुला भिती वाटली ...एकट वाटायला लागलं की मगच ही चिठ्ठी वाच...
 
गाडी सुरू होते. मुलाचा हा पहिलाच एकट्याने करायचा प्रवास.
जसा गाडीने वेग घेतला तो खिडकीतून गंमत बघायला लागला..पळती झाडे ..नदी डोंगर पाहून तो खुश झाला .
हळूहळू गर्दी वाढू लागली...अनोळखी लोकांच्या गराड्यात त्याला भिती वाटायला लागली. कुणीतरी आपल्याकडे एकटक बघतय अस त्याला उगाचच वाटायला लागलं. तो रडवेला झाला...
त्याला आता आईबाबा हवे होते अस वाटायला लागलं. 
तेवाढ्यात त्याला आठवलं की बाबांनी सांगितलं होत..की अस काही वाटायला लागलं तर खीशातली चिठ्ठी वाच...
त्याने भितभितच ती बाबांनी दिलेली चिठ्ठी काढली..
त्यावर एकच ओळ लिहीली होती..
बाळ भिऊ नको...मी पुढल्या डब्यात बसून तुझ्या सोबतच प्रवास करतोय..
त्याचे डोळे डबडबले...केवढा धीर आला त्याला..हायस वाटल...भिती कुठल्याकुठे पळाली.
 
भगवंतानेही आपल्या सर्वाच्या खिश्यात अशी एक चिठ्ठी लिहून आपल्याला या जगात प्रवासाला पाठवले आहे. या प्रवासात तो आपल्या सोबतच आहे...मग कसली आता भिती. हा प्रवास छान हसत, हसत करूया..ठरलं.