शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (23:48 IST)

15 दिवसांचेच आहे यावेळी लग्नांचे मुहूर्त, तारखा जाणून घ्या

दिवाळी संपली की लग्नाचा हंगाम येतो आणि शुभ मुहूर्त पाहून लोक लग्नाच्या तयारीला लागतात. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी काही शुभ मुहूर्त ठेवले आहेत. या सीझनमध्ये 19 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत फक्त 15 मुहूर्त आहेत. ज्या मुहूर्तांना शुभ मानले जाते त्या मुहूर्तावर विवाह अधिक होतात. हिंदूंमध्ये देवउठनी एकादशीपासून विवाह सुरू होतात. या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी देवउठनी एकादशीपासून शुभ कार्याला सुरुवात होणार आहे. मात्र यावेळी लग्नाच्या वेळा कमी असल्याने बहुतांश ठिकाणी लग्नसराई, हॉटेलमध्ये हव्या त्या तारखेचे बुकिंग लोकांचे होत नाही. 
 
किती दिवसांचा आहे मुहूर्त?
या ऋतूत देवउठनी एकादशी १५ नोव्हेंबरला आहे, पण पहिला शुभ मुहूर्त १९ नोव्हेंबरला आणि शेवटचा मुहूर्त १३ डिसेंबरला आहे. त्यानुसार या पुढील 2 महिन्यांत केवळ 15 शुभ मुहूर्त आहेत. यानंतर पुढील वर्षी 15 जानेवारी 2022 पासून शुभ मुहूर्त सुरू होईल. देवउठनी एकादशीला अबुझ मुहूर्तामुळे लग्नसोहळ्यांची रेलचेल असणार आहे.
 
हे असतील लग्नाचे मुहूर्त  
सन 2021 मध्ये नोव्हेंबर महिन्यात (19, 20, 21, 26, 28, 29 आणि 30) या 7 तारखेला शुभ मुहूर्त तयार होत आहे. याशिवाय डिसेंबर महिन्यात 8 शुभ मुहूर्त असून ते 1, 2, 5, 6, 7, 11, 12 आणि 13 तारखेला होत आहेत.