रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified गुरूवार, 28 एप्रिल 2022 (08:03 IST)

अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी

तुमच्या शब्दांत कित्ती आश्वासन आहे,
सदा च म्हणता तुम्ही"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!"
जे जे वाटे अशक्य सर्वच स्तरावर,
करतील स्वामी शक्य त्यास,सत्वर,
हाक मारा तयासी देह भान विसरून,
नको मी पण, फक्त त्यांचाच होऊन,
घेतील परीक्षा स्वामी खऱ्या
भक्तांची,
भाव असेल जर खरा, चिंता वाहतील स्वामी तयाची,
असाल जिथं तुम्ही ब्रम्हांडणायक,
 तिथंच होईल मी ही हो नतमस्तक !
....अश्विनी थत्ते