शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

अक्षय तृतीया

हा एक शुभ दिवस मानतात. एखाद्या नवीन कामाला आरंभ करावाचा झाल्यास यादिवशी करतात. दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. हा दिवस सर्व कामाला शुभ मानला आहे. कारण या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फल मिळते. विष्णू पार्वतीचे स्वामित्व असलेली ही तिथी आहे. या दिवशी केलेल देवपूजेमुळे घराण्यातील अनेक दोष नष्ट होतात. माणसाच्या हातून रोज अनेक चुका होत असतात. शुभ कार्य घडले, परीक्षेत यश मिळाले, लग्न झाले, पैसा मिळाला, सफल समारंभ झाले, एखाद्याला आशीर्वाद दिला अशा घटना घडल्यावर आपली पूर्ण पुण्याई कमी होत असते. 

जोर्पत पूर्वपुण्याई शिल्लक असते तोर्पत काही त्रास होत नाही, पण त्यानंतर त्रासाचे दिवस सुरू होतात. हाती घेतलेली कामे होत नाहीत. आरोग्य वारंवार बिघडू लागते. आर्थिक अडचणी सुरू होतात. निष्कारण गैरसमज निर्माण होतात. भांडणतंटे सुरू होतात. व्यसने जडतात, घरातील वातावरण बिघडते. यासाठी पुण्याईचा साठा वाढविणे ही काळाची गरज आहे. कुणाचे प्रारब्ध कसे असेल त्यानुसार पुण्य कमी जास्त होत असते. विनाशकाली विपरीत बुध्दी असं म्हणतात. आपला विनाशकाळ जवळ आला म्हणजे माणसाची बुध्दी बिघडते. हे कलियुग असल्याने कुणी कुणाचा मान ठेवत नाहीत. माणसाचा कल देवधर्माकडे नसतो. पुण्याई शिल्लक असेर्पत परिणाम दिसून येत नाहीत. नंतर मात्र दुष्कर्माचे चटके बसू लागतात.

पुण्याईचा साठा वाढणण्यासाठी अक्षय तृतीयेचे पूजन सांगितले आहे. शक्यतो कुलदेवतेची पूजा करावी. कुलदैवत माहिती नसल्यास कुठल्याही देवाची पूजा करून कुलदैवतौ नम: असे म्हणावे. या दिवशी जलदानाचे महत्त्व सांगितले आहे. जलदान, वृक्षसंवर्धन आणि मुक्या प्राणंना जीवनदान दिल्यास अनेक दोष नष्ट होतात.अक्षय ततीयेला केलेली पूजा ही घराणतील अनेक दोष नष्ट करून कुटुंबाचा उध्दार करते. शक्य असेल तर या दिवशी पाणपोया सुरू कराव्यात. पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी. झाडे जगवा झाडे वाचवा हे तत्त्व धनात ठेवावे.

म.अ. खाडिलकर