रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified सोमवार, 18 एप्रिल 2022 (12:58 IST)

Angarki Sankashti Chaturthi 2022 अंगारकी चतुर्थी शुभ मुहूर्त व महत्त्व

प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती व्रत केले जाते. यातील वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) व्रत करण्याची परंपरा आहे. मंगळवारी संकष्ट चतुर्थी आल्यावर त्याला अंगारक योग जुळून येतो आणि याला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. हिंदू नववर्षाच्या पहिल्याच संकष्ट चतुर्थीला अंगारक योग (Angarki Sankashti Chaturthi 2022) एप्रिल महिन्यातील चैत्र अंगारक संकष्ट चतुर्थी अर्थात 19 एप्रिल रोजी जुळून येत आहे. (Chaitra Sankashti Chaturthi April 2022)
 
चैत्र अंगारक संकष्ट चतुर्थी: मंगळवार 19 एप्रिल 2022
 
चैत्र वद्य अंगारक चतुर्थी प्रारंभ: मंगळवार 19 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 4 वाजून 39 मिनिटे.
 
चैत्र वद्य अंगारक चतुर्थी समाप्ती: बुधवार 20 एप्रिल 2022 रोजी दुपारी 01 वाजून 53 मिनिटे.
 
संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते तसेच यादिवशी चंद्रोदय आणि चंद्रदर्शन याचे महत्त्व आहे. अंगारक म्हणजे मंगळ म्हणून या दिवशी येणारी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते.अंगारकीचा उपवास केल्यानंतर वर्षभराच्या संकष्ट्या केल्याचे पुण्य मिळते, असे सांगितले जातं. म्हणूनच दर महिन्यात व्रत न करणारे देखील या दिवशी उपवास करतात.
 
संकष्ट चतुर्थीचे व्रत विधी 
चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
दिवसभर उपवास करावा.
गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी.
शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा.
अथर्वशीर्ष पाठाचे 21 वेळा आवर्तन करावे.
‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे.
प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे.
रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा.
चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे.
गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा.