रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (16:47 IST)

Bhadrapada 2021: पवित्र भाद्रपद महिन्यातील नियम जाणून घ्या

भाद्रपद महिन्यात हरितालिका तृतीया, गणेश चतुर्थी, ऋषि पंचमी, आणि अनंत चतुर्दशी सण साजरे केले जातात. यानंतर 15 दिवसाचा पितृपक्ष प्रारंभ होतो. या दरम्यान पाळले जाणारे नियम जाणून घ्या-
 
1. भाद्रपद महिन्यात लसूण, कांदा, मध, गूळ, दही-भात, मूळा, वांगी, कच्चे पदार्थ, मास आणि मासे यासह तामसिक भोजन टाळावे. तेलकट आणि मसालेदार आहार घेऊ नये.
 
2. शरीराच्या शुद्धीकरणासाठी एकदाच जेवावे.
 
3. या महिन्यात, सर्व प्रकारच्या सुखसोयींचा त्याग करावा आणि अंथरुणावर झोपणे देखील बंद करावे. जमिनीवर चटई टाकून त्यावर झोपायला हवे.
 
4. असत्य वचन बोलणे, कडू बोलणे, विश्वासघात, मत्सर, राग, या सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे.
 
5. कोणतेही शुभ कार्य करू नये.
 
6. या महिन्यात नारळाचे तेल वापरू नये. यामुळे संतान सुखात अडथळे येऊ शकतात.
 
7. भाद्रपद महिन्यात मादक पदार्थ, तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि अल्कोहोल इत्यादींचे सेवन टाळा.
 
8. या काळात शारीरिक संबंध टाळावेत.
 
काय करावे-
1. या महिन्यात भगवान विष्णु, श्रीकृष्ण, गणेशजी, माता पार्वती आणि शिवजी यांचे ध्यान करावे. असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
 
2. या महिन्यात पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे महत्त्व आहे. आळस दूर करण्यासाठी या महिन्यात गार पाण्याने अंघोळ करावी.
 
3. यथाशक्ती गरीबांना दान करावे.
 
4. श्रीकृष्णाला तुळस अर्पित करावी आणि तुळस दुधात उकळून पिणे देखील फायद्याचे आहे.
 
5. या महिन्यात लोणी खाल्ल्याने आयुष्यात वाढ होते.
 
6. शारीरिक ताकद मिळवण्यासाठी पंचगव्य म्हणजेच दूध, दही, तूप, गोमूत्र, शेण वापरावे.