शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (13:23 IST)

गायीबद्दल काही रोचक गोष्टी, जाणून आश्चर्य वाटेल

हिंदू धर्मात गायीचे महत्त्व केवळ यामुळे नव्हे की प्राचीन काळी भारत एक कृषीप्रधान देश होता आणि आजही आहे आणि गायीला अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. भारतासारखे इतर देश आहेत, जे शेतीप्रधान आहेत, पण तिथे गाईला भारताइतके महत्त्व मिळाले नाही. खरं तर, हिंदू धर्मात गायीचे महत्त्व असल्याचे आध्यात्मिक, धार्मिक आणि वैद्यकीय कारणे आहेत. चला काही वैज्ञानिक तथ्ये जाणून घेऊया ...

* गाय एकमेव प्राणी आहे जिचं सर्वकाही सर्वांच्या सेवेसाठी उपयुक्त आहे.
* स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात की, गाय आपल्या आयुष्यात 4,10,440 मानवांसाठी अन्न पुरवते, तर 80 मांसाहारी लोक तिच्या मांसाने पोट भरू शकतात.
* गाईचे दूध, मूत्र, शेण या व्यतिरिक्त दुधाने निघणारं तूप, दही, ताक, लोणी हे सर्व खूप उपयुक्त आहे.
* संपूर्ण संसदेने गोहत्या बंदीला पाठिंबा दिल्यानंतरही पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, जर हा ठराव मंजूर झाला तर मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देईन.
* एका माहितीनुसार मुस्लिम राजवटीच्या काळात गोहत्या अपवादस्वरूप होतं. आपले राज्य बळकट करण्यासाठी आणि हिंदूंमध्ये लोकप्रिय होण्यासाठी बहुतेक राज्यकर्त्यांनी गोहत्येवर बंदी घातली होती.
* ब्रिटिशांनी भारतात गोहत्येला प्रोत्साहन दिले. आपल्या गैरकृत्यावर पांघरूण घालण्यासाठी त्यांनी कत्तलखान्यांमध्ये मुस्लिम कसाईंची नेमणूक केली होती.
* गुरू वशिष्ठांनी गायीचे कुटुंब वाढवले ​​आणि त्यांनी गायीच्या नवीन प्रजातीही निर्माण केल्या, तेव्हा गायीच्या फक्त 8 किंवा 10 जाती होत्या ज्यांचे नाव कामधेनू, कपिला, देवानी, नंदानी, भाऊमा इ. होते.
* गाईचे महत्त्व वाढवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गाय पूजेसाठी आणि गोशाळे बांधण्यासाठी नवीन पाया घातला होता. भगवान बालकृष्ण यांनी गोपाष्टमीपासून गायी चरायला सुरुवात केली.
* पंजाब केसरी महाराजा रणजीत सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीत राज्यात गोहत्येसाठी फाशीची शिक्षा कायदा केला.
* रामचंद्र 'बीर' यांनी गोहत्या थांबवण्यासाठी 70 दिवस उपवास केला होता.
* वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की गायाप्रमाणे इतर कोणत्याही प्राण्यामध्ये सकारात्मक ऊर्जा नाही.
* गाईच्या पाठीच्या कण्यातील सूर्यकेतु मज्जातंतू हानिकारक किरणोत्सर्गाला रोखून पर्यावरण स्वच्छ ठेवते. हे पर्यावरणासाठी फायदेशीर आहे.